पन्हाळा किल्ला माहिती मराठी | Panhala Fort Information in Marathi

Panhala Fort Information in Marathi, पन्हाळा किल्ला माहिती मराठी, पावनखिंड लढाई सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पन्हाळा किल्ला (Panhala Fort Information in Marathi) हा महाराष्ट्रातील कोल्हापूर पासून 20 किलोमीटर वर पन्हाळा येथे आहे.

पन्हाळा किल्ल्याला सापाचे घर असेही म्हणतात कारण की त्याची रचना ही झिगझॅग असल्यामुळे असे वाटते की भिंतीवर साप चालत आहे.

पन्हाळा किल्ल्या जवळ जुना राजवाडा येथे श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. ज्यामध्ये एक भुयार आहे जि थेट पन्हाळगडावर जाऊन निघते. भुयारची लांबी 22 किलोमीटर आहे. ही भुयार सध्या बंद आहे.

पन्हाळा किल्ल्यावर तीन मजली इमारती खाली एक गुप्त विहीर आहे. त्याला अंधार बावडी म्हणून ओळखले जाते.

ही विहीर मुगल शासक आदिलशहा यांनी बांधली असे म्हटले जाते.

या विहीर बांधण्याच्या मागचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा शत्रु गडावर हल्ला करेल तेव्हा आदिलशहाचे सैनिक जवळच्या विहिरी आणि तलावांमध्ये विष मिसळवत होते.

Table of Contents

पन्हाळा किल्ला माहिती मराठी (Panhala Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)पन्हाळा किल्ला
उंची (Height) 4040 फुट
प्रकार (Type) गिरिदुर्ग
ठिकाण (Place) कोल्हापूर
जवळचे गाव (Nearest Village) पन्हाळा
स्थापना(Built) इसवी सन 1178 – 1209
कोणी बांधलाशिलाहार शासक भोज II
सध्याची स्थिती व्यवस्थित
चढाईची श्रेणी सोपी
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपावनखिंड लढाई, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर 500 हून अधिक दिवस राहिले
Panhala Fort Information Marathi

पन्हाळा किल्ला इतिहास मराठी (Panhala Fort History in Marathi)

पन्हाळा किल्ल्याचा इतिहास(Panhala Fort History in Marathi) हा खूप जुना इतिहास आहे. याचे कारण म्हणजे हा किल्ला इसवी सन 1178 – 1209 मध्ये शिलाहार शासक भोजा II यांनी बांधला.

शिलाहार शासक राजा भोज यांनी बांधलेल्या 15 किल्ल्यांपैकी पन्हाळा किल्ला त्यामधला एक आहे.

शिलाहार शासक राजा भोज यांच्यानंतर पन्हाळगड किल्ला हा यादव यांच्या ताब्यात देण्यात आला.

बिदारचे बहामनिस मोहम्मद गव्हाण जे सेनापती होते त्यांनी 1469 मध्ये हल्ला करून हा किल्ला ताब्यात घेतला.

16 व्या शतकात हा किल्ला बिजापूर यांनी काबीज केला.

आदिलशहा यांनी या गडावर दरवाजे व चबुतरे यांचे काम करून घेतले.

1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधानंतर केवळ 18 दिवसात हा किल्ला स्वराज्यात आणला.

1701 मध्ये औरंगजेबाने पुन्हा गड काबीज केला.

6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी 60 मावळे सोबत घेऊन भेदनीतीचा वापर करून पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला.

पन्हाळा किल्ला कोणी बांधला?

शिलाहार शासक राजा भोज यांनी इसवी सन 1178 – 1209 मध्ये पन्हाळा किल्ला बांधला आहे

शिवरायांनी पन्हाळगड कोणाच्या ताब्यातून जिंकला?

1659 मध्ये अफजलखानाच्या मृत्युमुखी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला.

नंतर 1701 मध्ये औरंगजेबाने हा गड पुन्हा ताब्यात घेतला.

6 मार्च 1673 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी 60 मावळे सोबत घेऊन भेदनीतीचा वापर करून पुन्हा हा किल्ला स्वराज्यात आणला.

पावनखिंड लढाई (Pawankhind Fight)

2 मार्च 1660 मध्ये सिद्धी जोहर यांनी पन्हाळा किल्ला वेढा घातला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरचा वेढा तोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.

नेताजी पालकर यांनी बाहेरून सिद्दी जोहरचा वेढा फोडण्यात ते सुद्धा अयशस्वी ठरले.

नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला.

व त्यासाठी गुप्तहेर चे प्रमुख बहिर्जी नाईक यांना कामगिरी सोपवली. बहिर्जी नाईक यांनी विशाळगड पर्यंतचा वाटेची नियोजन केले.

दिवस ठरला व छत्रपती शिवाजी महाराज 600 बांदल मावळ्यांचा सोबत आणि शिवा काशिद दुसऱ्या पालखीत बसून निघाले.

काही वेळानंतर दोन्ही पालख्या वेगळ्या दिशेने धावू लागल्या.

थोडावेळ झाल्यानंतर शिवा काशिद यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या सैनिकांनी पकडले.

शिवा काशिद अगदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून सिद्धी जोहरच्या समोर उभे राहिले.

परंतु सिद्धी जोहर यांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिले नव्हते म्हणून आणि शिवा काशिद हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्याला कोणतेही शक आले नाही.

परंतु अफजल खानाचा मुलगा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना बघितले होते व अफजलखानाच्या चकमकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर अफझल खानाच्या तलवारीचे वार झाल्याचे त्याला माहिती होते व त्याच गोष्टीमुळे शिवा काशिद पकडला गेला.

नंतर शिवा काशिदची सिद्दी जोहर याने हत्या केली.

सिद्दी जोहर याला काढताच छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे केले त्यांनी आपले सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लावले काही सैनिक विशाळगडावर ठेवले.

पावनखिंड जवळ असताना सिद्दी जोहर याचे सैनिक खूप जवळ आल्यामुळे बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले व म्हटले की तुम्ही विशाळगडावर पोचल्यावर तोफांचे तीन बार द्या तोपर्यंत आम्ही या खिंडीत गणीम रोखून ठेवतो.

बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्यासोबतचे बांदल मावळे आखरी श्वासापर्यंत लढत राहिले व जोपर्यंत विशाल गडावरून तोफांचे तीन बार ऐकले नाही तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे लढत राहिले.

बाजीप्रभू देशपांडे व सर्व बांदल मावळे यांच्या रक्तांनी खिंड पावन झाली म्हणून याला पावनखिंड असे म्हणतात.

पन्हाळा किल्ला फोटो (Panhala Fort Images)

Panahala Fort Images

पन्हाळा किल्लावरील पहाण्यासारखी ठिकाणे (Places To See On Panhala Fort)

बाजीप्रभूंचा पुतळा

एसटी बस स्टॉप वरून थोडे समोर चौकात गेल्यावर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा आहे.

राजवाडा

हा राजवाडा राणी ताराबाई यांचा आहे. इथूनच राणी ताराबाई यांनी आपला राज्यकारभार चालवला होता.

वाडा एकदम बघण्यासारखा आहे व त्यातील देवघर अगदी सुंदर आहेत. पण आता तिथे पन्हाळा हायस्कूल आहे.

महालक्ष्मी मंदिर

राजवाड्यातून बाहेर निघाल्यावर नेहरू उद्यानाकडे चालत गेल्यावर खालच्या बाजूस जे मंदिर लागते ते महालक्ष्मी मंदिर होय.

हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे असे म्हटले जाते कारण की याच्या बांधणीवरुन ते साधारणपणे 1000 वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज लावले जाते.

सज्जाकोठी

राणी ताराबाईंच्या वाड्यावरून समोर गेल्यावर सज्जा कोठी इमारत दिसते.

याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना प्रांताचा कारभार पाहण्यासाठी ठेवले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त खलबते याच इमारतीमध्ये चालत.

राजदिंडी मार्ग

ही वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेडा तोडण्यात यशस्वी झाले.

हीच वाट विशाळगडावर जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना उपयोगी पडली.

याच वाटेने 45 मैलांचे अंतर कापून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले.

अंबरखाना

अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला होय. इथेच गंगा, यमुना, सरस्वती यासारखे 3 धान्य कोठारे आहेत.

या तीन धान्य कोठारांमध्ये 25000 खंडी धान्य साठवून ठेवता येत असे.

या धान्य कोठारांमध्ये मुख्यता वरी नागली आणि भात धन्य असायचे.

चार दरवाजा

हा दरवाजा पूर्वेकडील महत्त्वाचा दरवाजा होय. इसवी सन 1844 मध्ये हा दरवाजा इंग्रजांनी पाडून टाकला.

चार दरवाजाचे थोडेसे भग्नावशेष आज पण शिल्लक आहेत

शिवा काशीद पुतळा

चार दरवाजाला लागूनच शिवा काशीद यांचा पुतळा आहे.

सोमाळे तलाव

गडाच्या पेठा ला लागून एक मोठे तलाव आहे तेच हे सोमवारी तलाव होय.

सोमेश्वर मंदिर

तलावाच्या जवळच सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिर आला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या संपूर्ण मावळ्यांनी लक्ष चाफ्याची फुले वाहिली होती.

रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी

सोमेश्वर तलावापासून थोडे समोर गेल्यावर दोन समाध्या दिसतात.

त्यातील उजवीकडची समाधीही रामचंद्रपंत अमात्य यांचे आहे व बाजू ची समाधी त्यांच्या पत्नीची समाधी आहे.

रेडे महाल

रामचंद्रपंत अमात्य यांच्या समाधीला लागून एक इमारत आहे त्याला रेडे महाल असे म्हणतात.

पहिले ही पागा होती परंतु नंतर तिथे जनावर बांधत असल्यामुळे त्याला रेडे महाल असे नाव देण्यात आले.

संभाजी मंदिर

गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे एक छोटेसे मंदिर आहे.

धर्मकोठी

छत्रपती संभाजी महाराजांच्या मंदिरासमोरून गेल्यावर एक इमारत लागते ती म्हणजे धर्म कोटी होय.

धान्य कोठारा तून धान्य आणून येथून लोकांना वाटून दानधर्म केला जात असे.

तीन दरवाजा

पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजे तीन दरवाजा होय. एका पाठोपाठ तीन दरवाजे असल्यामुळे शत्रूला आत येणे सोपे नव्हते.

इसवी सन 1676 मध्ये कोंडाजी फर्जंद यांनी 60 मावळ्यांसोबत हा किल्ला जिंकला होता.

अंधार बावडी

तीन दरवाजाच्या वरच्या बाजूला तीन मजली ची काळा दगडाची इमारत दिसते.

ही इमारत मुगल शासक आदिलशहा यांनी बांधली असे म्हटले जाते.

सर्वात खालच्या मजल्यावर खोल पाण्याची विहीर आहे त्याला अंधार बावडी असे म्हटले जाते.

मधला मजला हा चांगला मोठा आहे त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी एक चोर दरवाजा आहे.

पन्हाळा किल्ला नकाशा (Panhala Fort Map)

Panhala Fort Map

पन्हाळगड ते विशाळगड अंतर (Panhala Fort to Vishalgad Fort Distance)

पन्हाळा किल्ला ते विशाळगड किल्ल्याचे अंतर 63 किलोमीटर आहे.

FAQ on Panhala Fort Information in Marathi

पन्हाळा किल्ला कोणी बांधला?

शिलाहार शासक राजा भोज यांनी इसवी सन 1178 – 1209 मध्ये पन्हाळा किल्ला बांधला आहे

पन्हाळा किल्ल्याचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व काय आहे?

पावनखिंड लढाई, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर 500 हून अधिक दिवस राहिले.

पन्हाळा किल्ल्याची उंची किती आहे?

4040 फुट

Q. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Ans. कोल्हापूर

पन्हाळा किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

पन्नग्नालय

निष्कर्ष

Panhala Fort Information in Marathi पन्हाळा किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा

Comments are closed.