सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi

Sindhudurg Fort Information in Marathi, सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी, सिंधुदुर्ग किल्ला इतिहास मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्यावर धाक बसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कर गोळा करण्यासाठी या सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण केले होते.

सिंधुदुर्ग किल्ला 48 एकर मध्ये पसरलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे बांधकामाचे काम हिरोजी इंदुलकर यांना सोपवले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी (Sindhudurg Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)सिंधुदुर्ग किल्ला
उंची (Height) ३० फूट रूंदी १२ फूट
प्रकार (Type) जलदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण (Place)सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
जवळचे गाव (Nearest Village) सिंधुदुर्ग, मालवण
स्थापना(Built)25 नोव्हेंबर 1664
कोणी बांधला (Who Build)हिरोजी इंदुलकर
बेटकुरटे
Sindhudurg Fort Information Marathi

सिंधुदुर्ग किल्ला इतिहास मराठी (History of Sindhudurg Fort in Marathi)

सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला मालवणच्या किनारपट्टीपासून कुरटे बेटावर वसलेला आहे ज्याला जमिनीवर जाण्यासाठी बोटीने जावे लागते.

ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ल्या साठी कुरटे बेटाची निवड केली त्यांना गावे देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकर मध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1664 मध्ये करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामाचे काम हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवले होते.

आणि सोबतच 300 पोर्तुगीज आर्किटेक्ट आणि 3000 मनुष्यबळ इतकी माणसे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी आले.

त्यामुळे हा किल्ला तीन वर्षात म्हणजे 1667 मध्ये पूर्ण झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने सिंधुदुर्ग किल्ल्याचे पाय बांधण्याचे कामाची सुरुवात झाली.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घालण्यासाठी 70000 किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिशाचाच्या मदतीने किल्ल्याचा पाया मजबूत करण्यात आला.

सिंधुदुर्ग किल्ल्याची भिंत 29 फूट उंच आणि 12 फूट रुंदीची ची भिंत 2 मैलावर पसरलेली आहे. किल्ल्यावर सुमारे 52 बुरूज आहेत.

असे म्हटले जाते की काही बुरुजावरुन गुप्त मार्ग सुद्धा आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन इतका खर्च आला होता असे म्हटले जाते.

पश्चिम आणि दक्षिण तटाच्या पाय बांधण्यासाठी 500 खंडी शिसे लागले होते व याचा खर्च 80 हजार होन इतका आला होता.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 30 ते 40 शौचालय बांधले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षे आधीपासूनच स्वच्छतेचा संदेश यातून दाखवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे या किल्ल्यावर पायाचे आणि हाताचे ठसे उमटलेले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे (Places to See On Sindhudurg Fort)

प्रवेश द्वार

सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार हे पूर्वेच्या दिशेने आहे.

किल्ल्याचे प्रवेशद्वाराचे अशी रचना केली आहे की दुरूनच वाटते की किल्ल्याचे भिंत असल्यासारखे पण किल्ल्याच्या त्याजवळ उतरल्यावर एक खिंड लागते मग सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रवेशद्वार लागतो.

किल्ल्याच्या दरवाजा साठी उंबराच्या लाकूड आणि सागवान लाकडाची जोड करून बनवलेला आहे. उंबराचे लाकूड हा दीर्घकाळ टिकतो म्हणून याचा उपयोग केला आहे.

गोड्या पाण्याची विहीर

सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत.

शिवराजेश्वरांचे मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती या मंदिरात आहे.

शिव मंदिर

या मंदिरामध्ये शिवलिंगा सोबतच एक भुयार आहे जी तीन किलोमीटर खोल आणि 12 किलोमीटर लांबीचे आहे जी गावात निघते.

छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कल्पना होती की जर सिंधुदुर्ग किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर गडावरील स्त्रियांना सुखरूप गावात पोहोचल्या जाईन आशी या गुप्त मार्गाची व्यवस्था होती

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती व्हिडिओ मध्ये बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

FAQ on Sindhudurg Fort Information in Marathi

सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात

सिंधुदुर्ग किल्ला कोणी बांधला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी हीरोजी इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला

सिंधुदुर्ग किल्ला बांधायला किती खर्च लागला?

1 कोटी होन

सिंधुदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व काय आहे?

या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हाता पायाचे ठसे उमटले आहेत शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती फक्त या किल्ल्यावरच आहे.

निष्कर्ष

Sindhudurg Fort Information in Marathi सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा