वसई किल्ला माहिती मराठी | Vasai Fort Information in Marathi

Vasai Fort Information in Marathi वसई किल्ला माहिती मराठी [Vasai Fort Information in Marathi](Vasai Fort History in Marathi, Vasai Fort marathi mahiti, Bassein Fort Information in Marathi सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

वसई किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसईजवळ असणारा एक भुईकोट किल्ला असून तो समुद्रकिनाऱ्यालगत बांधलेला आहे.

वसई किल्ल्याचे जुने नाव बेसिन (Bassein) किल्ला या नावाने वसई किल्ला प्रसिद्ध होता.

वसई किल्ला हा वसईतील एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे.

महाराष्ट्रातील किल्ल्यांमध्ये हा प्रसिद्ध किल्ला आहे. पूर्वीच्या काळी वसईला बेसिन, बस्या, बाजीपूर अशा अनेक नावांनी ओळखले जात असे.

वसई किल्ला माहिती मराठी ( Vasai Fort Marathi Mahiti) मध्ये वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा

वसई किल्ला माहिती मराठी (Vasai Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)वसई किल्ला
उंची (Height) समुद्रसपाटीलगत
प्रकार (Type) भुईकोट
ठिकाण (Place) पालघर, महाराष्ट्र
जवळचे गाव (Nearest Village) जुन्नरवसई
स्थापना(Built) 1536
कोणी बांधलापोर्तुगीज
सध्याची स्थितीव्यवस्थित
Vasai Fort Information history map Marathi

वसई किल्ला इतिहास मराठी (Vasai Fort History in Marathi)

व्यापाराच्या दृष्टीने वसईचे महत्त्व ओळखून पोर्तुगीजांनी वसईला भारतातील मुख्य व्यापारी व लष्करी तळ बनवण्याचा निर्णय घेतला आणि पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला.

वसईचा किल्ला पोर्तुगीजांनी 1536 मध्ये बांधला होता.

किल्ल्याला समुद्राच्या पाण्याने वेढले आहे, त्यामुळे वसई किल्ल्याचे सौंदर्य खुलते. हा वसई किल्ला एकूण 110 एकर परिसरात पसरलेला आहे.

त्यामुळे हा किल्ला आकाराने खूप मोठा आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

बासीन किल्ला हा तीन बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला किल्ला आहे. किल्ल्याला दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी एक जमिनीकडे उघडतो आणि दुसऱ्या बाजूला भव्य तटबंदी आहे.

किल्ल्याला चारही बाजूंनी खूप उंच तटबंदी होती आणि त्याची उंची 30 फुटांपेक्षा जास्त होती.

पूर्वी वसईच्या किल्ल्यावर व्यापारी कारागीर असायचे अशा प्रकारे संपूर्ण गाव वसलेले होते.

वसईच्या किल्ल्यावर चर्च, कॉलेज, धान्य कोठार, वाचनालय, टाऊन हॉल, हॉस्पिटल आणि गजबजलेली बाजारपेठ होती.

त्यामुळे हे ठिकाण व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते.

त्यामुळे मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या हातून हा किल्ला घेण्याचे ठरवले.

1737 साली हा प्रयत्न केला गेला पण मराठ्यांना हा किल्ला ताब्यात घेता आला नाही म्हणून हे प्रयत्न निष्फळ ठरले.

यानंतर बाजीराव पेशवे यांनी वसई किल्ला जिंकण्याची जबाबदारी त्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांच्यावर सोपवली.

त्यानंतर 1738 मध्ये चिमाजी अप्पांनी वसई किल्ला ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली.

त्यानंतर त्यांनी वसईच्या किल्ल्यावर हल्ला केला.

चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांसोबत झालेल्या वसईच्या लढाईत सेंट सेबस्तियन बुरूज सुरूंगाने उडवून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्याचे सांगितले जाते.

२ मे १७३९ रोजी झालेली लढाई दोन दिवस चालली. या लढाईत अनेक पोर्तुगीज मारले गेले.

पोर्तुगीजांनी त्यांचा दारूगोळा आणि लढण्याचे धैर्य गमावले आणि पोर्तुगीजांचा पराभव झाला. अशा प्रकारे मराठ्यांनी किल्ला जिंकला.

वसई किल्ल्याच्या भिंतीवर चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विजयाचे शिलालेख सापडतील.

त्यानंतर 1780 मध्ये इंग्रजांनी वसई किल्ला ताब्यात घेण्याची योजना आखली.

त्यावेळी विसाजी लेले हे वसई किल्ल्याचे किल्लेदार होते. 28 ऑक्टोबर रोजी मारामारी होऊन गोळीबार सुरू झाला.

अखेर १२ डिसेंबर रोजी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

वसई किल्ल्याची रचना

वसईचा किल्ला महत्त्वाच्या ठिकाणांकडे लक्ष देण्याच्या आणि मजबूत करण्याच्या हेतूने बांधला गेला.

त्यामुळे वसई किल्ल्यावर अनेक शस्त्रे, सैनिक आणि खजिना असायचा त्यामुळे हा किल्ला त्याकाळी अत्यंत महत्वाचा किल्ला होता.

वसईच्या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे पाणी आहे आणि गडावर जाण्यासाठी एका बाजूला जमीन वापरता येत असल्याने किल्ला अतिशय सुरक्षित होता.

या किल्ल्याच्या जमिनीच्या बाजूला खूप उंच भिंती आहेत त्यामुळे या किल्ल्यावर जमिनीच्या बाजूनेही हल्ला करणे अवघड होते.

वसईच्या किल्ल्याला दहा कोन असून त्या प्रत्येक एका बुरुजला नाव दिले आहे.

नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या दहा बुरुजांची नावे होती.

गडाच्या बुरुजांची लांबी सुमारे एक किलोमीटर आहे. त्यावेळी अशा लढायांसाठी उपयुक्त असलेल्या बुरुजांवर बंदुका आणि रायफल ठेवल्या जात.

किल्ल्याच्या बुरुजावर सैनिकांच्या अनेक तुकड्या तैनात होत्या, बुरुजावर मुक्काम करून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देत होते.

प्रत्येक बुरुजावर आठ सैनिक व त्यांचा एक कप्तान असे पथक तैनात करण्यात येत असे.

किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच आणि 5 फूट रुंद असल्यामुळे अतिशय मजबूत आहे.

एखाद्या वेळी शत्रूने अचानक हालचाल केली तर ते सुरक्षितपणे किल्ल्यावरून बाहेर पडावेत या हेतूने गडावर अनेक चोर दरवाजेही आहेत.

तसेच या किल्ल्यावर समुद्रातून येणारा भुयारी मार्गही पाहायला मिळतो. हा भुयारी मार्ग खूप लांब आहे.

वसई किल्ला नकाशा (Vasai Fort Map)

Vasai Fort map

FAQ on Vasai Fort Information in Marathi

वसईचा किल्ला का प्रसिद्ध आहे?

वसई किल्ला हा प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे हा किल्ला फार मोठा असून 110 एकर मध्ये पसरलेला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक वास्तू आहे ज्या आजही चांगल्या आहे.

वसईचा किल्ला कोणी ताब्यात घेतला?

बाजीराव पेशवे यांच्या सांगण्यावरून वसई किल्ला हा चिमाजी अप्पा यांनी ताब्यात घेतला होता.

वसई किल्ल्यावर किती चर्च आहेत?

वसईच्या किल्ल्यात तुम्हाला चर्च ऑफ डॉमिनिकन आणि सेंट पॉल चर्चसह अनेक चर्च पाहायला मिळतील.

वसई किल्ल्यावर सर्वात जास्त राज्य कोणी केले?

वसई किल्ल्यावर सर्वात जास्त राज्य पोर्तुगीजांनी केले आणि नंतर इंग्रजांनी केले.

भारतात पोर्तुगीजांचा पराभव कोणी केला?

भारतात पोर्तुगीजांचा पराभव चिमाजी अप्पा यांनी केले. या लढाईला बॅटल ऑफ बेसिन असे म्हटले जाते.

निष्कर्ष

Vasai Fort Information in Marathi वसई किल्ला माहिती मराठी [Vasai Fort Information in Marathi](Vasai Fort History in Marathi, Vasai Fort marathi mahiti, Bassein Fort Information in Marathi सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा