होळी सणाची माहिती मराठी | Holi Information in Marathi

Holi Information in Marathi होळी सणाची माहिती मराठी [Holi Information in Marathi] (Holi History in Marathi, Holi Chi Mahiti Marathi, Holi Festival Information in Marathi)सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

Holi Information in Marathi भारतातील रंगांचा होळी सण हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा, होलिकेच्या नाशाचा उत्सव आहे.

हा सण दरवर्षी हिंदू महिन्यात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या दिवशी साजरा केला जातो.

हा हिंदू सण असला तरी, गैर-हिंदूंमध्ये तो लोकप्रिय आहे.

होळी सणाची माहिती मराठी |Holi Information in Marathi

सणहोळी, होलिका, होलिकादहन
केव्हा साजरी करतातफाल्गुनी पोर्णिमेच्या दिवशी
किती दिवस साजरा केला जातो2 किंवा 3 दिवस
कोण साजरा करतोमुख्यता हिंदू लोक
Holi Information Marathi

होळीचा इतिहास मराठी | Holi History in Marathi

एकेकाळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता त्याने पृथ्वीचे राज्य जिंकले होते.

हिरण्यकश्यप राजा इतका अहंकारी होता की त्याने आपल्या राज्यात असे सांगितले की फक्त त्याचीच पूजा सर्वांनी करायची दुसरा कोणाची पूजा करण्यास सक्त मनाई होती.

परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद ही गोष्ट मानत नव्हता.

प्रल्हाद फक्त नारायण देव यांची पूजा करत होता हे हिरण्यकश्यपला बिलकूल आवडले नव्हते.

हिरण्यकश्यप ने प्रल्हाद ला मारण्यासाठी खूप प्रयत्न केले पण नेहमी विष्णू देव त्याला वाचवून घ्यायचे.

नंतर हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीला म्हणजे होलिकाला सांगितले की प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन आगीत बसायला.

कारण की होलिकाला वरदान होते की तिला अग्नीमध्ये काही होत नव्हते.

विश्वासघाताने होलिकाने प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन स्वतः अग्नीमध्ये प्रवेश केला.

आख्यायिका अशी आहे की होलिकाला या अशुभ इच्छेमुळे प्राण गमवावे लागले.

कारण की होलिकाला माहीत नव्हते की तिने फक्त एकटीने अग्निप्रवेश केल्यावरच ते वरदान काम करत होते.

प्रल्हाद नारायण देवाचे नामस्मरण करत असताना सुखरूप अग्नीच्या बाहेर आला.

त्यामुळे होळीला होलिका हे नाव पडले.

म्हणून आपण होलिकादहन सण साजरा करतो कारण की वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण होलिका दहन सण साजरा करतो.

होळी हा सण का साजरा केला जातो

प्राचीन काळापासून संपूर्ण भारतात रंगांचा सण साजरा केला जातो.

मुळात हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव साजरा करणारा कृषी सण होता.

हे हिवाळ्यातील उदासपणा दूर करण्याचे आणि वसंत ऋतूच्या जिवंतपणाचा आनंद घेण्याचा सन होय.

होलिकादहन सण साजरा करतो कारण की वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण होलिका दहन सण साजरा करतो.

होळी म्हणजे काय – Holi Chi Mahiti

होळी म्हणजे हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात साजरा करणारा सण होय.

होळी या सणात लोक एकमेकाला रंग लावून हा सण साजरा करतात आणि तसेच या दिवशी महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात पुरणपोळी करतात.

होळी हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

होळी सण कसा साजरा केला जातो

होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो ज्यामध्ये पहिल्या दिवशी आपण होलिका दहन करतो आणि दुसऱ्या दिवशी रंग खेळून हा दिवस साजरा करतो.

होळी सणाचा पहिला दिवस

होलिका दहन, जळणारी राक्षसी होलिका, ही कार्यक्रमाची पहिली संध्याकाळ आहे.

या रात्री लोक जमतात, आगीत धार्मिक विधी करतात आणि प्रार्थना करतात की त्यांच्यातील वाईट गोष्टींचा नाश व्हावा ज्या प्रकारे होलिकाचा अग्नीत मृत्यू झाला होता.

होळी सणाचा दुसरा दिवस

दुसऱ्या दिवशी सकाळी लोक आनंदोत्सवाची खरी परंपरा सुरू करतात आणि एकमेकांना रंग लावतात.

लोक त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह देखील जमतात.

कधीकधी अधिक मनोरंजनासाठी वॉटर गन आणि पाण्याने भरलेले फुगे वापरतात.

होळी हा सण कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये खेळला जातो

होळी हा सण देशभरामध्ये साजरा केला जातो तरीपण काही राज्यांमध्ये हा खूप आधीपासून हा सण प्रचलित आहे.

महाराष्ट्र,पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, बंगाल, मनिपुर, केरळ, बिहार, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

गोवा मध्ये होळी हा सण शिग्मो नावांनी प्रसिद्ध आहे.

होळी हा सण विविध राज्यांमध्ये कोणत्या नावाने साजरा केला जातो आपण खालील प्रमाणे बघू शकता.

गोवाशिग्मो
पंजाबहोला मोहल्ला
केरळमंजाल कुली
बिहारफागुवा
उत्तराखंडखडी होली- कुमाऊ
उत्तर प्रदेशलाठमार होली- बरसाना
बंगालबसंत उत्सव, दोल जत्रा
मणिपूरयाओसांग
आसामफाकुवा

निष्कर्ष

Holi Information in Marathi होळी सणाची माहिती मराठी [Holi Information in Marathi] (Holi History in Marathi, Holi Chi Mahiti Marathi, Holi Festival Information in Marathi)सर्व माहिती तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आपल्या मित्रांशी शेअर करायला विसरू नका.

अधिक लेख वाचा

FAQ on Holi Information in Marathi

Q. होळी हा सण का साजरा केला जातो?

Ans. होलिकादहन सण साजरा करतो कारण की वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण होलिका दहन सण साजरा करतो.

Q. होळी हा सण कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये खेळला जातो?

Ans. महाराष्ट्र,पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, बंगाल, मनिपुर, केरळ, बिहार, आसाम अशा अनेक राज्यांमध्ये होळी हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.