शिवनेरी किल्ला माहिती मराठी | Shivneri Fort Information in Marathi

Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला हा भारतातील महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ 17व्या शतकातील लष्करी तटबंदी आहे.

शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे.

येथे किल्ल्याच्या आत जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात.

बदामी तलावच्या दक्षिणेला जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

किल्ल्यात गंगा आणि यमुना नावाचे दोन पाण्याचे झरे असून त्यात वर्षभर पाणी असते.

Table of Contents

शिवनेरी किल्ला माहिती मराठी (Shivneri Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)शिवनेरी किल्ला
उंची (Height)3500 फुट
प्रकार (Type) गिरिदुर्ग
ठिकाण (Place)पुणे
जवळचे गाव (Nearest Village) जुन्नर
स्थापना 1170
Shivneri Fort Information Marathi

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास मराठी (Shivneri Fort History in Marathi)

शिवनेरी हे इ.स. च्या पहिल्या शतकापासून असण्याची शक्यता आहे कारण की गडावर बौद्ध साम्राज्याचे खूप सारे अवशेष आहेत.

येथील लेणी, दगडी बांधकाम आणि पाण्याची व्यवस्था इ.स. पहिल्या शतकापासून असण्याची उपस्थिती दर्शवते.

देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात असल्याने शिवनेरी हे नाव पडले. या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने देशातून कल्याण या बंदर शहराकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर पहारा ठेवण्यासाठी केला जात असे.

15व्या शतकात दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यानंतर हे ठिकाण बहमनी सल्तनतकडे गेले आणि नंतर ते 16व्या शतकात अहमदनगर सल्तनतकडे गेले.

1595 मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले यांना अहमदनगरचे सुलतान म्हणजे बहादूर निजाम शाह यांनी सक्षम केले आणि त्यांनी त्यांना शिवनेरी आणि चाकण दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ल्यावर झाला (काही माहितीनुसार 1627) आणि त्यांचे बालपण तेथेच गेले.

किल्ल्याच्या आत शिवाई देवीला समर्पित एक लहान मंदिर आहे, ज्यांच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी हे नाव पडले.

1673 मध्ये इंग्रज प्रवासी फ्रेज याने किल्ल्याला भेट दिली आणि त्याला तो अजिंक्य वाटला.

त्याच्या नोंदीनुसार, किल्ल्यामध्ये 7 वर्षे हजार कुटुंबांचे पोट भरण्यासाठी पुरेसा होता.

तिसर्‍या अँग्लो-मराठा युद्धानंतर 1820 मध्ये हा किल्ला ब्रिटिश राजवटीत आला असे म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला कधी सोडला

इसवी सन 1630. इ.स. 1632 मध्ये जिजामाताने काही कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजसह शिवनेरी किल्ला सोडला आणि 1637 मध्ये शिवनेरी किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.

शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाकडून जिंकला?

1595 मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले यांना अहमदनगरचे सुलतान म्हणजे बहादूर निजाम शाह यांनी सक्षम केले आणि त्यांनी त्यांना शिवनेरी आणि चाकण दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी कसे पडले

इ.स. 1595 मध्ये शिवनेरी किल्ला आणि जुन्नरचा भाग मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला.

जिजामाता यांचे वडील लखुजी जाधव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी महाराजांनी त्यांना 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरी किल्ल्यावर पाठवले.

शिवनेरी किल्ल्यावर श्रीभवानीमाता शिवाई ला जिजामाताने नवस केला जर पुत्र झाला तर तुझें नाव ठेवीन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे पडले.

Shivneri Fort Images

शिवनेरी किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे

सात दरवाजे

शिवनेरी किल्ल्यावर येतांना 7 दरवाजे लागतात.

पहिला दरवाजा हा महादरवाजा, दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा, तिसरा दरवाजा हा पीर दरवाजा, चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा, पाचवा दरवाजा हा शिपाई दरवाजा, सहावा दरवाजा म्हणजे फाटक दरवाजा(कुलूप दरवाजा) आणि सातवा दरवाजा म्हणजे कुलाबकर दरवाजा (मेना दरवाजा)असे शिवनेरी किल्ल्यावर सात दरवाजे आहेत.

प्रवेशद्वार

शिवनेरी गडावरील प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा हा पेशव्यांनी बांधला असे म्हटले जाते. हा गडावरील पहिला दरवाजा आहे.

कारण की महादरवाज्याची बनावट ही पेशवेकालीन आहे.

महादरवाज्याला बुरुज आणि चढण्यासाठी पायऱ्या आहेत.

तानाजी मालुसरे उद्यान

शिवनेरी गडावर गेल्यानंतर पीर दरवाजा पार केल्यानंतर आपल्याला तानाजी मालुसरे उद्यान देखील पाहायला मिळते जे गडाच्या डाव्या बाजूला आहे.

शिवाई देवीचे मंदिर

शिवनेरी किल्ल्यावर एकूण सात दरवाजे आहेत त्यामधील पाचवा दरवाजा मधून आत गेल्यावर उजव्या बाजूने शिवाई देवीचे मंदिर लागते.

पाचवा दरवाजाला शिपाई दरवाजा सुद्धा म्हटले जाते

बुद्धांचे लेणी

मंदिरापासून काही पुढे गेल्यानंतर आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या काही लेण्या देखील पाहायला मिळतील.

शिवाजी महाराजांचे जन्म घर

शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे आपल्या सर्वांना माहित आहे.

तेथे गेल्यानंतर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या इमारतीमध्ये झाला ती इमारत पाहायला मिळते.

हि इमारत २ मजली आहे आणि खालच्या मजल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

येथे किल्ल्याच्या आत जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

बदामी तलाव

गडाच्या मध्यभागी बदामी आकाराचा तलाव आहे म्हणून त्याला बदामी तलाव असे म्हणतात व तिथे दोन अशा बसण्याच्या जागा आहे जिथे आधीच्या काळात उन्हाळ्यात थंडगार वाटेल अशी व्यवस्था आहे.

बदामी तलावाच्या मध्यभागी एक खांब आहे ज्यांनी पाहिले तलावाच्या पाण्याची पातळी मोजली जात होती

कडेलोट टोक

बदामी तलावाच्या थोडेसे पुढे गेले कि कडेलोट टोक आहे याची उंची जवळ जवळ १५०० फुट आहे.

कडेलोट टोकाचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता.

गंगा जमुना टाकी

शिवनेरी गडावर दोन पाण्याच्या टाक्या आहेत ज्यांना गंगा आणि जमुना टाकी असे म्हटले जातात.

अंबरखाना

गडाचे सर्व दरवाजे पार केल्यानंतर लगेचच लागतो तो अंबरखाना या अंबरखाण्याचा वापर पूर्वीच्या काळी धन्य ठेवण्यासाठी केला जात होता पण आत्ता तो पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो.

शिवकुंज

शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक आहे ज्याला शिवकुंज असे म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जिजामाता यांची पण मूर्ती पाहायला मिळते.

शिवनेरी किल्ला नकाशा (Shivneri Fort Map)

Shivneri Fort Map

शिवनेरी किल्ल्यावर कसे जायचे

मुंबईहून माळशेज मार्गे

जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते ९ किलोमीटर अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास मुंबईपासून एक दिवस लागतो.

पुणेहून नारायणगाव मार्गे

पुणे मधून नारायणगाव पर्यंत साधारणत 75 कि.मी. अंतरावर आहे. पुणे-नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव-जुन्नर मार्गे 15 कि.मी वर आहे

FAQ on Shivneri Fort Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

शिवनेरी किल्ल्यावर

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

पुणे जिल्ह्यात

छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ला कधी सोडला

1632

निष्कर्ष

Shivneri Fort Information in Marathi शिवनेरी किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा