सिंहगड किल्ला माहिती मराठी | Sinhagad Fort Information in Marathi

Sinhagad Fort Information in Marathi सिंहगड किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

सिंहगड किल्ला हा भारतातील पुणे शहरापासून 49 किलोमीटर आहे.

सिंहगड किल्ला हा एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यावरच्या यावरून असे दिसते की सिंहगड किल्ला 2 हजार वर्ष पूर्वीचा आहे.

कोंढाणेश्वर मंदिरातील लेणी आणि कोरीव काम याचा पुरावा देतात.

सिंहगड हा किल्ला राजगड किल्ला, पुरंदर किल्ला आणि तोरणा किल्ला यांच्या मध्यभागी आहे.

सिंहगड किल्ला माहिती मराठी (Sinhagad Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)सिंहगड किल्ला
उंची (Height) 1312 मीटर (4304फुट)
प्रकार (Type) डोंगरी किल्ला
ठिकाण (Place)पुणे
जवळचे गाव (Nearest Village)सिंहगड
स्थापना
Sinhagad Fort Information Marathi

सिंहगड किल्ल्याचा इतिहास (History of Sinhagad Fort)

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा असे होते. कौंदिन्य ऋषींच्या नावावरून “कोंढाणा” असे नाव या किल्ल्याचे पडले होते.

कोळी राजा नाग नाईक याच्याकडून 1328 मध्ये मोहम्मद बिन तुगलक यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी भोसले यांना पुणे प्रदेशाच्या ताबा देण्यात आला होता.

आदिलशाहीला वाटले की छत्रपती शिवाजी महाराज पण आदिलशाही स्वीकारतील.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले.

1647 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती लढवून हा किल्ला ताब्यात घेतला.

सिंहगड किल्ल्याचा ताबा आदिलशाहीच्या सरदार सिद्दि अंबर कडे होता.

पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी अंबरला असे पटवून दिले की आम्ही शहाजी भोसले यांचे पुत्र आम्ही या किल्ल्याचा सांभाळ चांगल्या पणे करू शकतो म्हणून सिंहगड किल्ला सिद्दि अंबर ने छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात सोपवून दिले.

आदिलशाहीने या देशद्रोहसाठी सिद्दि अंबर यांना तुरुंगात टाकले व सिंहगड किल्ला पुन्हा ताब्यात मिळण्यासाठी योजना आखली.

त्यांनी शहाजी भोसले यांना कटकारस्थान करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकले.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितले की जर तुम्ही सिंहगड किल्ला आमच्या ताब्यात दिला तर तुमच्या वडिलांना आम्ही सुखरूपणे सोडून देण्यात येईल.

1649 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीला सोपवून दिला.

1656 मध्ये पुन्हा युक्ती लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगड किल्ल्याचे सेनापती बापूजी मुदगल देशपांडे यांना नवीन असलेल्या शिवापुर गावात जमीन देऊन हा किल्ला शांतपणे ताब्यात घेतला.

सिंहगड किल्ल्यावर 1662, 1663 आणि 1665 मध्ये मोगलांनी हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी हल्ले केले होते.

1664 मध्ये शाहिस्तेखान यांनी किल्ल्यावरील लोकांना लाच देऊन किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

1665 मध्ये पुरंदरच्या तहात गड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झा राजा जयसिंग यांना द्यावा लागला.

1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लहानपणीचे मित्र व सुभेदार तानाजी मालसुरे यांना सिंहगड किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी सांगितले.

1689 पर्यंत हा किल्ला मराठा स्वराज्यात राहिला होता.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी पुन्हा ताब्यात घेतला होता.

Sinhagad Fort Images

Sinhagad Fort Images

सिंहगड लढाई माहिती (Battle of Sinhagad Fort in Marathi)

सिंहगड लढाई ची माहिती ही सर्वांनाच माहिती असायला हवी की स्वराज्य च्या कामासाठी लोक कसे तत्पर रहायचे.

त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र सेनापती तानाजी मालसुरे होय.

सेनापती तानाजी मालसुरे यांच्या मुलाचं लग्न होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालसुरे यांच्या वर एक महत्त्वाची जिम्मेदारी सोपवली.

ती म्हणजे कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणायची आणि तानाजी मालसुरे यांनी हसत म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचं.

तानाजी मालुसरे यांनी आपलं भाऊ सूर्याजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्यासोबत काही निवडक मावळे घेऊन कोंडाणा किल्ला घेण्यासाठी निघाले.

असे म्हटले जाते की तानाजी मालसुरे यांनी यशवंती नावाच्या घोरपडी चा आधार घेऊन कोंढाणा किल्ल्याची सर्वात कठीण कळा चढला होता.

पण काही माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना गड चढण्यासाठी शिकवण द्यायचे असे म्हटले जाते.

किंवा तुम्ही बघू शकता की हरेक गड-किल्ल्यांवर चढण्यासाठी काहीना काही अशी मदत ठेवले आहे की फक्त मावळ्यांनी तो किल्ला सहज चडू शकले पाहिजे.

तानाजी मालुसरे आणि उदयभान सिंग राठोड याच्यात घनघोर युद्ध झाले, तेव्हा तानाजी मालुसरे यांची डाव्या हाताची ढाल तुटल्यामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले.

पण सूर्याजी मालुसरे यांनी ज्या वाटेने पूर्ण मावळे गडावर शिरले होते त्या वाटेचे पूर्ण दोर सूर्याजी मालुसरे यांनी कापून काढले आणि म्हटले की इथून फक्त मरण पत्करून बाहेर निघू शकतात.

अशा रीतीने सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला.

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की कोंढाणा किल्ला आपल्या हातात आला पण तानाजी मालुसरे यांना मरण आलं.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडून निघाले होते की गड आला पण सिंह गेला.

मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवले.

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय आहे?

सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा किल्ला आहे.

सिंहगड किल्ला नकाशा (Sinhagad Fort map)

Sinhagad Fort map

सिंहगड किल्ल्यावर कसे जायचे

तुम्ही सिंहगडाला पुण्यापासून जाऊ शकता.

तुम्ही ह्या गड-किल्ल्यावर दोन प्रकारे जाऊ शकता.

जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही डायरेक्ट सिंहगडाच्या जवळ पार्किंगमध्ये गाडी लावू शकता.

जर तुमच्याकडे स्वतःचे वाहन नसेल तर तुम्ही सिंहगडावर एसटी बसने जाऊ शकता.

तुम्हाला शनिवार वाडा पासून 50 नंबरच्या बसने तुम्ही सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकता.

सिंहगड किल्ल्याचे ट्रेक (Sinhagad Fort Trek)

जर तुम्हाला सिंहगड किल्ल्यावर ट्रेक करून जायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी दीड तास लागेल.

किल्ल्यावर ट्रेक करून गेल्यावर किल्ल्यावर जायची जी मजा ती खुपच वेगळे असते.

सर्वांनी एकदा तरी सिंहगड ट्रेक करावी

FAQ on Sinhagad Fort Information in Marathi

सिंहगड किल्ल्याचे नाव सिंहगड कसे पडले?

छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की कोंढाणा किल्ला आपल्या हातात आला पण तानाजी मालुसरे यांना मरण आलं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तोंडून निघाले होते की गड आला पण सिंह गेला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव सिंहगड किल्ला असे ठेवले.

सिंहगड किल्ला आधी कोणत्या नावाने ओळखला जायचा?

कोंढाणा किल्ला

सिंहगडाच्या लढाईत कोण जिंकले होते?

स्वराज्याचे मावळे

सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालसुरे जिवंत होते का?

नाही, तानाजी मालुसरे यांना सिंहगडच्या लढाई मरण आले.

छत्रपती शिवाजी महाराज तानाजीला माझा सिंह का म्हणत?

छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालसुरे यांना त्याच्या ताकदीमुळे ‘सिंह’ म्हणत

तानाजी मालुसरे यांना मरण आले तेव्हा त्यांचे वय किती होते?

तानाजी मालुसरेचे वय माहिती नाही पण त्यांना मरण 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी आले

निष्कर्ष

Sinhagad Fort Information in Marathi सिंहगड किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा

अधिक लेख वाचा