द्रौपदी मूर्मू बायोग्राफी मराठी | Draupadi Murmu Biography in Marathi

Draupadi Murmu Biography in Marathi, द्रौपदी मुर्मू.माहिती मराठी, Draupadi Murmu Information in Marathi, Draupadi Murmu age, Draupadi Murmu Education, Draupadi Murmu Marriage, Draupadi Murmu birth date सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

एका आदिवासी महिला ज्यांच्याबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे, त्यांचा आजवरचा प्रेरणादायी प्रवास असा आहे की तो प्रत्येक भारतीयाला आणि महिलेला प्रोत्साहित करणारा आहे.

द्रोपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत.

शिक्षिका पासून ते देशाच्या प्रथम नागरिक म्हणजे राष्ट्रपती होण्यापर्यंतचा द्रोपदी मूर्मू यांचा प्रवास आपण पाहणार आहोत.

देशातील पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु आहेत.

आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एका आदिवासी समाजातील राष्ट्रपती असलेल्या द्रोपदी मुर्मू यांचा चरित्र, कुटुंब, वैयक्तिक जीवन आणि त्यांचा राजकीय प्रवास आपण पाहणार आहोत.

Table of Contents

द्रौपदी मूर्मू बायोग्राफी मराठी (Draupadi Murmu Biography in Marathi)

नाव (Name)द्रौपदी मूर्मू
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा
जन्म दिनांक (Date of Birth)20 जून 1958
वय (Age)65 वर्ष
शिक्षण (Education)बीए पदवी
आईचे नाव (Mother’s Name)
वडिलांचे नाव (Father’s Name)बिरांची नारायण टूडू
पतीचे नाव (Husband’s Name)शामचरण मुर्मू
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
नेट वर्थ (Net Worth)
Draupadi Murmu Biography information mahiti Marathi

द्रोपदी मुर्मू यांचा जन्म

द्रोपदी श्याम चरण मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 मध्ये बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा झाला.

ओडिसा मधील मयूरभांज जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबामध्ये द्रोपदी यांचा जन्म झाला.

यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण टूडू आहे. द्रोपदी मुर्मू यांचे वडील गावचे सरपंच होते. द्रोपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला आहेत.

द्रौपदी या भारतीय राजकारणी आहेत आणि भाजपा (भारतीय जनता पार्टी) पक्षाच्या सदस्य आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचे शिक्षण

त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातूनच पूर्ण केले.

भुवनेश्वर मध्ये असलेल्या महादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं

गावाच्या मध्यभागी असलेल्या उपरबेडा मध्ये उत्करमित माध्यमिक शाळेमध्ये द्रोपदी मुर्मू यांनी शाळेत शिक्षण घेतले.

द्रोपदी यांना सहावी सातवी मधील शिकवणारे शिक्षक विश्वेश्वर महांतो असे सांगतात की, द्रोपदी मुर्मू लहानपणापासूनच अतिशय हुशार होत्या खाली वेळेमध्ये महापुरुषांची चरित्रे,कथा वाचायच्या.

भुवनेश्वराच्या रमा देवी महाविद्यालयातून बीए ( आर्ट्स ग्रॅज्युएट) ची पदवी प्राप्त केली.

द्रोपदी यांनी करिअरची सुरुवात शिक्षिका म्हणून केली.

त्यानंतर आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असत.

द्रोपदी मुर्मू विवाह (Draupadi Murmu Marriage)

द्रोपदी मुरू यांचा विवाह श्याम चरण मुर्मू (Draupadi Murmu Husband)सोबत 1976 मध्ये झाला.

द्रोपदी मुर्मू फॅमिली (Draupadi Murmu Family)

या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी झाली. मुर्मू यांचा मोठा मुलगा लक्ष्मण मुर्मू याचे निधन 2009 मध्ये झाला.

पतीचे नाव (Husband’s Name)श्याम चरण मुर्मू
मुलाचे नाव (Son’s Name)लक्ष्मण मुर्मू, सिप्पून मूर्मु
मुलीचे नाव (Daughter’s Name)इतिश्री मुर्मू

त्यानंतर काही काळातच त्यांचा लहान मुलगा सिप्पून मूर्मु यांचा 2013 मध्ये निधन झाले.

2014 मध्ये द्रोपदी यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचे देखील निधन झाले.

त्यांच्या आयुष्यात अशा दुर्दैवी घटना एका नंतर एक घडून गेल्या. त्यांच्या कुटुंबात द्रोपदी यांची मुलगी, नातं आणि जावई हे कुटुंबामध्ये आहेत.

द्रोपदी मुर्मू यांचे प्रेरणास्थान

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या तिघांनी द्रौपदी मर्मु यांना प्रभावित केले. या तीन महापुरुषांना आपले आदर्श मानतात.

राष्ट्रपती द्रोपदी मर्मू यांनी फेब्रुवारी 2023 असे म्हटले होते की , डॉ बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवासमान आहेत, त्यांच्यामुळेच आज मी राष्ट्रपती बनू शकले.

द्रौपदी यांचे राजकीय कारकीर्द

द्रोपदी मुर्मू राजकारणात येण्यापूर्वी एक शिक्षिका म्हणून कार्य करत होत्या.

नगरसेविका, आमदार, राज्य सरकारमधील मंत्री व राज्यपाल अशा अनेक राजकीय पदावर द्रौपदी यांनी काम केले आहे.

1997 मध्ये राजकीय कारकीर्दीला द्रौपदी यांचे सुरुवात झाली.

खऱ्या अर्थाने आपल्या राजकीय कारकिर्दीला एक वार्ड काऊंसलेर म्हणून सुरुवात केली.

रायरांगपुर नगरपरिषदेत द्रौपदी मुर्मू या नगरसेविका झाल्या. द्रोपदी यांनी काही काळ नगर परिषदेचे उपाध्यक्ष पदवी भूषवलं.

1997 रोजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून द्रोपदी मुर्मू निवडून आल्या.

या काळात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते.

2000 ते 2004 या कालावधीमध्ये स्वतंत्र प्रभारासह ओरिसा सरकार मध्ये राज्यमंत्री म्हणून द्रोपदी मुर्मू यांनी परिवहन आणि वाणिज्य खाते हाताळण्याचे संधी मिळाली.

2002 ते 2004 या कालावधीमध्ये द्रोपदी यांनी ओरिसा सरकारचे राज्यमंत्री म्हणून आणि पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय हे खाते देखील सांभाळले आहेत.

2002 ते 2009 या कालावधीमध्ये द्रोपदी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.

2002 ते 2009 या कालावधीमध्ये द्रौपदी यांना मयूरभांज जिल्हा भाजपचे अध्यक्ष पदही मिळाले होते.

2004 या काळामध्ये द्रौपदी या रायरांगपुर विधानसभेतून आमदार बनल्या होत्या.

2006 ते 2009 या कालावधीमध्ये द्रोपदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या एसटी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद भूषवले.

2013 ते 2015 या कालावधीमध्ये द्रौपदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य झाल्या.

2015 मध्ये द्रौपदी यांना झारखंडचे राज्यपाल पद मिळाले. हे राज्यपाल पद 2021 पर्यंत त्यांच्याकडे होते.

झारखंडच्या पहिला महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू होत्या. 18 मे 2015 ते 12 जुलै 2019 इतका कार्यकाल त्यांचा राज्यपाल पदाचा होता.

भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या ओडिसा मधील पहिला महिला आदिवासी नेत्या आहेत.

आदिवासी समाजासाठी वकिली

द्रोपदी मुर्मू या सर्वात उल्लेखनीय कामगिरीपैकी एक म्हणजे आदिवासी समाजातील हक्कांसाठी व वकिली करणे होय.

आदिवासी समाजातील समस्या आणि त्यांच्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. द्रौपदी यांनी या समस्यांचे निराकरण केले.

झारखंड मध्ये राज्यपाल पदी कार्यकाळामध्ये द्रोपदी आणि आदिवासी सामुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले.

शाळा, रुग्णालय, आणि प्रशिक्षण केंद्रांचे बांधकाम तसेच आदिवासी तरुणांमध्ये स्वयंरोजगार आणि उद्योजकता याला चालना देण्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम केले.

आदिवासी जमाती मधील लोकांसाठी आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी आणि शिक्षण मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन केले.

झारखंडमधील लोकप्रिय राज्यपाल द्रौपदी मुर्मू

झारखंडचे राज्यपाल 2015 मध्ये भाजपाच्या( भारतीय जनता पक्ष) मयूरभांज च्या जिल्हाध्यक्ष म्हणून द्रौपदी मुर्मू काम पाहत होत्या.

त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आले 18 मे 2015 रोजी द्रोपदी यांनी झारखंडच्या पहिला महिला तसेच आदिवासी समुदायातील पहिल्या म्हणून कार्यभार हाती घेतला.

6 वर्षापेक्षा अधिक काळ द्रोपदी यांनी राज्यपाल पदावर कार्यरत होत्या. झारखंड मधील लोकप्रिय राज्यपाल म्हणून द्रोपदी मुर्मू होत्या.

कदाचित त्यांना पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरही त्यांची लोकप्रियता पाहून त्यांना पदावरून हटवण्यात आलं नव्हतं.

भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यभार

आज पर्यंत अनेकांना द्रौपदी मुर्मूबद्दल माहिती नव्हती, पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी नंतर त्या खूपच चर्चेत आले होते.

2022 मध्ये जुलै महिन्यात झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली.

विरोधी पक्ष नेत्यांनी यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली होती.

21 जुलै 2022 मध्ये द्रोपदी आणि 2022 च्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा 28 पैकी 21 राज्यांमध्ये 6,76,803 मतांनी पराभव करून बहुमत मिळवले.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती म्हणजे द्रोपदी मुर्मू आहेत.

राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर द्रोपदी मुर्मू दुसऱ्या महिला आहेत.

2022 मध्ये जुलै महिन्यात मोझांबिकच्या संसदीय शिष्टमंडळाने मोझांबिकच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनाला भेट दिली होती.

द्रोपदी मुर्मू यांना मिळालेले पुरस्कार

  • 2007 मध्ये सर्वोत्कृष्ट आमदारचा नीलकंठ पुरस्कार द्रोपदी यांना मिळाला होता. ओरिसा विधानसभेने द्रौपदी यांना हा पुरस्कार दिला होता.
  • 25 जुलै 2015 ते आज पर्यंत भारताच्या 15व्या राष्ट्रपती द्रौपदी आहेत.
  • 18 मे 2015 ते 12 जुलै 2021 पर्यंत झारखंडच्या झारखंडच्या 9 व्या राज्यपाल होत्या.

FAQ on Draupadi Murmu Biography in Marathi

द्रोपदी मुर्म कोण आहेत?

भारताच्या पहिल्या आदिवासी समुदायातील राष्ट्रपती आहेत.

झारखंडच्या पहिला महिला राज्यपाल कोण आहेत?

द्रोपदी मुर्म या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत.

द्रोपदी मुर्म कोणत्या समाजामधील आहे?

आदिवासी समाजातील द्रोपदी मुर्म आहेत.

द्रौपदी यांच्या पतीचे नाव कायआहे?

द्रौपदी यांच्या पतीचे नाव श्याम चरण मूर्मू हे आहे.

द्रोपदी मुर्मू यांचा जन्म कधी झाला?

द्रोपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 मध्ये बैदापोसी, मयूरभंज जिल्हा, ओडिशा झाला.

निष्कर्ष (Conclusion)

Draupadi Murmu Biography in Marathi, द्रौपदी मुर्मू.माहिती मराठी, Draupadi Murmu Biography in Marathi, Draupadi Murmu age, Draupadi Murmu Education, Draupadi Murmu Marriage, Draupadi Murmu birth date सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज  क्लिक करा 

अधिक लेख वाचा