सावित्रीबाई फुले माहिती मराठी | Savitribai Phule Information in Marathi

Savitribai Phule Information in Marathi, सावित्रीबाई फुले माहिती मराठी, [Savitribai Phule Information in Marathi] Savitribai Phule Education, Savitribai Phule Age, Savitribai Phule Marriage, Savitribai Phule Death सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

भारतीय समाज सुधारक शिक्षण तज्ञ आणि कवयित्री असलेल्या भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत.

भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले आहेत. सावित्रीबाईंना शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखले जाते.

भारतामध्ये स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा दर्जा दिला जात नव्हता अशा वेळी स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व हे सावित्रीबाईंनी पटवून दिले.

अशा या समाजसुधारक, शिक्षणतज्ञ असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Table of Contents

सावित्रीबाई फुले माहिती मराठी (Savitribai Phule Information in Marathi)

नाव (Name)सावित्रीबाई फुले
जन्म स्थान (Place of Birth)नायगाव, सातारा
जन्म दिनांक (Date of Birth)3 जानेवारी 1831
वय (Age)66 वर्ष
शिक्षण (Education)
आईचे नाव (Mother’s Name)लक्ष्मीबाई खंडोजी पाटील
वडिलांचे नाव (Father’s Name)खंडोजी नेसे पाटील
पतीचे नाव (Husband’s Name)ज्योतिराव फुले
मुलाचे नाव (Son’s Name)यशवंत फुले
मृत्यू (Death)10 मार्च 1997
Savitribai Phule Information Mahiti Marathi

सावित्रीबाई फुले यांचे बालपण

3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव असलेल्या गावांमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला.

त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नेसे पाटील असे होते.

सावित्रीबाईंचा 1840 मध्ये विवाह झाला तेव्हा त्या वयाने 9 वर्षाच्या होत्या आणि महात्मा ज्योतिबा फुले हे तेरा वर्षाचे होते.

ज्योतिराव फुले हे समाजसुधारक आणि लेखक होते.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण

पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे त्या लग्नाच्या आधी शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या.

त्या काळामध्ये स्त्रीने शिक्षण मिळवणे हा एक प्रकारचा पापच मानला जायचं. सावित्रीबाईंचे बालपण हे नव्या वर्षी सासरे येण्याचं झालं.

त्यावेळेस सावित्रीबाईंना शिक्षणाची जाणीव नव्हती.

त्यांनी शाळेचे कधी तोंडही पाहिले नव्हते. सावित्रीबाई फुले यांचे पती ज्योतिराव फुले यांनी चालीरीती मोडीत काढून सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवलं.

ज्योतिबा फुलेंना नेहमी अस वाटायचं की स्त्रियांनी शिकावं आणि त्यांनी याची सुरुवात आपल्या पत्नीपासूनच केली.

सावित्रीबाईंना सुद्धा शिक्षणाची आवड झाली. सावित्रीबाईने जिद्दीन अभ्यास करून अध्यापिकेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्याने शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले.

सावित्रीबाईंचे सामाजिक कार्य

ज्योतिरावांनी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे वाड्यात 1848 रोजी मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक करण्यात आली होती.

त्यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका असे म्हटले जाते.

पुण्यामध्ये पारंपारिक समाजाने स्त्रियांनी शिकणे हे पाप आहे आणि त्यांना शिकवणे हे सुद्धा पाप आहे असं मानलं जायचं.

शाळकरी विद्यार्थिनी असलेले सावित्रीबाई त्याच्यावर आणि शारीरिक हिंसेचा सामना करावा लागत असे.

काहींनी तर तिच्यावर चिखल फेकले. पण सावित्रीबाई या जिद्दी होत्या.

जोतीरावांनी आणि सावित्रीबाईंनी इसवी सन 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी एकूण 18 शाळा काढल्या. “काव्य फुले” हा पहिला कवितासंग्रह इसवी सन 1854 साली प्रकाशित झाला.

जोतीराव आणि सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात “बालहत्या प्रतिबंध गृहाची” स्थापना 28 जानेवारी 1853 रोजी केले आणि एक प्रसुती गृह ही सुरू केले.

सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद 1893 साली सावित्रीबाईंनी भूषवले.

महात्मा फुले यांनी “सत्यशोधक समाजाची स्थापना” 24 सप्टेंबर 1873 रोजी सुरू केले. या कार्यामध्ये जोतीरावांच्या बरोबरीने सावित्रीबाई सहभागी होत्या.

सावित्रीबाईंनी स्त्रियांची सेवा मिशनरी पद्धतीने केली सहन करून त्यांनी तिने कार्य चालू ठेवले.

गोरगरीब मुलांसाठी घरातच वसतिगृह चालू केले वसतिगृहाच्या खर्चासाठी ज्योतिराव ख्रिश्चन मिशनच्या शाळेमध्ये अर्धा वेळ नोकरी करायचे.

अस्पृश्य लोकांसाठी पाण्याचा हौद सुरू केला .

दुष्काळामध्ये सावित्रीबाईंनी समाजाला लोकसेवेचा आदर्श घालून दिला. अनाथ मुलांची काळजी घेण्याचे काम देखील सावित्रीबाई फुले करायच्या.

मुलींची पहिली शाळा

1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेत भिडे वाड्यामध्ये साठी पहिली शाळा स्थापन केली.

या शाळेत सुरुवातीला विविध जातीच्या नऊ नऊ मुलींनी प्रवेश केला सगुनाबाई देखील शिक्षिका म्हणून काम करायच्या.

मुली भूगोल, मराठ्यांचा इतिहास, बालकलानाचे विषय या सर्वांचा अभ्यास करून देशाच्या विकासात आपला मोलाचा वाटा दिला.

शाळेसाठी पुस्तके सदाशिव गोवंडे यांनी व्यवस्थापित केले. 15 मे 48 रोजी दलित वसाहतीत आणखी एक शाळा सुरू केली.

जोतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी एका वर्षात पाच शाळा सुरू केल्या. अल्पसंख्याकांसाठी शिक्षणाच्या आपल्या शालेय विद्यार्थिनी फातिमा शेख यांना मुस्लिम महिला शिक्षिकेसाठी नेमणूक केली .

जोतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये आणि जवळपास 18 शाळा स्थापन केल्या.

जिथे शेकडो विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण घेऊन जीवनमान सुधारले. या दाम्पत्यांना पण शाळेतील मुले त्यांची मुलं होती.

सावित्रीबाईंनी शिक्षण प्रसारासाठी अनेक संघर्ष केला.

विरोधकाने सावित्रीबाईंवर चिखल फेक करायचे,कचरा टाकायचे, तर काही लोकांनी अंगावर हा टाकण्याची भाषा करायचे.

तरीही सावित्रीबाई जिद्दी होत्या. एक साडी घेऊन जात असत आणि शाळेत असल्यावर दुसरी साडी घालत असे. परंतु त्या खचल्या नाहीत महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी त्या नेहमी लढत असे.

विधवा पुनर्विवाह साठी संघर्ष

त्याकाळी मुलींचे कमी वयाच्या आणि वृद्ध माणसांसोबत विवाह करण्याची प्रथा होती. त्यामुळे अनेक मुली १२- १३ वर्षे विधवा पुनर्विवाह ब्राह्मण समाजात मान्यता नव्हती.

आपल्या पतीच्या मृत्यूनंतर, विधवा मुलीने सती जावे लागायचे, तिला पतीच्या चितेवर जिवंत जाळायचे किंवा स्वतःच आत्मदहन करत असे.

विधवा झालेल्या मुलींचे केशवपन करायचे आणि त्यांना कुरूप करायचे. इतकी भयानक अवस्था विधवा मुलींची होत असे.

जोतिरावांनी महिला आणि विधवा स्त्रियांसाठी या समस्येवर उपाय म्हणून बाल हत्या प्रतिबंधक सुरू केले.

सावित्रीबाईंनी केशवपन म्हणजे स्त्रियांच्या डोक्यावरील सर्व केस कापून टाकण्याची पद्धत बंद केली आणि पुनर्विवाहाच्या कायद्यासाठी प्रयत्न केले.

कवयित्री सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई या उत्तम शिक्षिका तर होत्या पण कवयित्री सुद्धा होत्या.

1854 रोजी “बावनकशी सुबोध रत्नाकर “ आणि “काव्य फुले” हे पुस्तके प्रकाशित केले. जा शिक्षण मिळवा ही कविता 1892 मध्ये लिहिली. ही कविता लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन करत होती.

सावित्रीबाई फुले यांचे निधन

यशवंतराव डॉक्टर हे सावित्रीबाईंचे दत्तक पुत्र होते. 1897 मध्ये पुण्यामध्ये भयानक प्लेगची साथ पसरले.

या प्लेगच्या साथीने अनेकांचे जीव घेतले. सावित्रीबाई ह्या रुग्णांची सेवा करत असताना, त्यांनाही लागण झाली.

10 मार्च 1997 मध्ये सावित्रीबाईंचे निधन झाले . सावित्रीबाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत रुग्णांची आणि समाजाची सेवा केली.

सावित्रीबाईंचा सन्मान

  • 3 जानेवारी 1995 पासून सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा “बालिका दिन “ म्हणून साजरा केला जातो.
  • सावित्रीबाईंचे कार्य पाहून 1852 रोजी पुण्यातील “ईस्ट इंडिया कंपनी “ सरकारने फुले दाम्पत्यांचा मेजर कॅंडी यांच्या हस्ते सत्कार केला आणि सरकारी शाळांना अनुदान देण्यात आले.
  • भारत सरकारने सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे महत्त्व म्हणून 10 मार्च 19 98 रोजी दोन रुपयाचे डाक तिकीट सुरू केले.
  • महाराष्ट्र सरकारने 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचे नाव “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ” असे ठेवले.
  • सावित्रीबाई फुले यांच्या 186 व्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2017 रोजी गुगलने “डूडल” प्रसिद्ध करून अभिवादन केले.
  • सावित्रीबाई फुले यांची पुण्यामध्ये अर्ध प्रतिमा आहे.
  • 1983 मध्ये पुणे सिटी कार्पोरेशनने एक स्मारक तयार केले.
  • 2018 मध्ये फुलेंबद्दल कन्नड बायोपिक चित्रपट तयार झाला होता.

FAQ on Savitribai Phule Information in Marathi

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले?

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन 10 मार्च 1997 रोजी झाले.

सावित्रीबाईंचे लग्न कोणत्या वयात झाले?

सावित्रीबाई फुले यांचे लग्न 9 वर्षाच्या असताना ज्योतीराव फुले यांच्याशी झालं. ज्योतिराव फुले यांचे वय 13 वर्षाचे होते.

भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

भारतातील पहिली महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आहेत. 

सावित्रीबाई व जोतिराव यांनी विधवा काशीबाई नातू यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते?

सावित्रीबाई व जोतिराव यांनी विधवा काशीबाई नातू यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव यशवंत फुले होते.

सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण किती झाले होते?

सावित्रीबाई फुले या अशिक्षित होत्या पण ज्योतीराव फुले यांनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवलं नंतर त्या दुसऱ्या मुलींना शिकवू लागल्या.

सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा कधी सुरू केली?

सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 सुरू केली

निष्कर्ष (Conclusion)

Savitribai Phule Information in Marathi, सावित्रीबाई फुले माहिती मराठी, Savitribai Phule Education, Savitribai Phule Age, Savitribai Phule Marriage, Savitribai Phule Death सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा