किरण बेदी माहिती मराठी | Kiran Bedi Information in Marathi

Kiran Bedi Information in Marathi, Kiran bedi Biography in Marathi, किरण बेदी मराठी माहिती, Kiran Bedi history in Marathi, Kiran Bedi Birth, Kiran bedi family, Kiran bedi Marriage, Kiran Bedi police careers, Kiran Bedi tennis player, Kiran Bedi Award, Kiran Bedi Biography in Marathi, किरण बेदी जीवनचरित्र, माहिती, निबंध, किरण बेदी पोलीस कारकीर्द, किरण बेदी शिक्षण सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

भारताची पहिली महिला आयपीएस ऑफिसर म्हणून “किरण बेदी” यांची ओळख आहे.

धडाडी आणि साहसी म्हणजे काय, याचं जिवंत उदाहरण म्हणजेच किरण बेदी.

स्त्री ही एखादी गोष्ट जिद्दीने आणि कर्तुत्वाने मिळवणारी असते. पण त्यामागे केलेले प्रचंड मेहनत व जिद्द असते आणि यातून घडतं तो इतिहास.

जर स्त्री ने मनात आणले तर ती अख्खं जग चालवू शकते, पण हे वाक्य सत्यात उतरले आहे.

जिजाबाई, मदर टेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, ऐश्वर्या राय, सानिया मिर्झा, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई, मेरी कोम, यांनी आपल्या कामगिरीतून भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे आणि त्यांनी स्वतःची अशी एक ओळख निर्माण केलेली आहे.

आपण पाहतच आहोत की स्त्रिया या पुरुषांप्रमाणेच खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.

एकेकाळी स्त्रियांनी फक्त चूल आणि मुलच सांभाळणे असं म्हटलं जातं असे.

पण किरण बेदी भारताच्या पहिला आयपीएस ऑफिसर झाल्या. स्त्रियांनी फक्त घर न सांभाळता त्या जगही चालू शकतात हे काही चुकीचं नाही.

आज या लेखात आपण मला किरण या नावाने जग ओळखते असे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना कधीकाळी सुनावलेल्या किरण बेदी यांचा जीवन परिचय आपण जाणून घेणार आहोत.

नाव (Name)किरण बेदी
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)अमृतसर, पंजाब
जन्म दिनांक (Date of Birth)9 जून 1949
वय (Age)74 वर्ष
शिक्षण (Education)एस.आर. सरकार कॉलेज (बीए ऑनर्स)
पंजाब विद्यापीठ (एमए)
दिल्ली विद्यापीठ (LL.B.)
आयआयटी दिल्ली (पीएच.डी.)
आईचे नाव (Mother’s Name)प्रेमलता पेशावरिया
वडिलांचे नाव (Father’s Name)आकाश लाल पेशावरिया
पतीचे नाव (Husband’s Name)ब्रिज बेदी
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
Kiran Bedi Information Biography Mahiti Marathi

किरण बेदी यांचा जन्म (Kiran Bedi Birth)

किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाब मध्ये असलेल्या अमृतसर येथे एका कापड व्यावसायिकाच्या घरात झाला.

एका गरीब घरात जन्मलेल्या किरण बेदी पुढे जाऊन देशभरात त्यांच्या नावाचा गजर होईल याची त्यांना जराही कल्पना नव्हती.

किरण बेदी यांच्या वडिलांचे नाव प्रकाश लाल पेशावरिया या आणि आईचे नाव प्रेम पेशावरिया असे आहे.

किरण बेदी या टेनिस खेळाडू सुद्धा होत्या. त्यांच्या वडिलांना आवड होती. तिथूनच किरण बेदी यांना टेनिस खेळण्याची आवड निर्माण झाली.

किरण बेदी यांचे कुटुंब (Kiran Bedi Family)

प्रेमलता पेशावरिया त्यांच्या आई आणि आकाश लाल पेशावरिया हे त्यांचे वडील आहेत.

किरण बेदी यांना तीन बहिणी आहेत. रीता आणि अनु हे त्यांच्या दोन बहिणींचे नाव आहे.

किरण बेदी आणि त्यांच्या दोघी बहिणी या सुद्धा टेनिस खेळाडू आहेत.

किरण बेदी यांच्या पालकांना आपल्या मुलींना शिकवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

किरण बेदी यांच्या पालकांच्या अपेक्षेनुसार शिक्षणच नव्हे तर खेळामध्येही त्यांनी प्रतिभा सिद्ध केली.

किरण बेदी यांचे शिक्षण (Kiran Bedi Education)

अमृतसर मधील “सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल” मध्ये किरण बेदी यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले.

किरण बेदी शाळेमध्ये असताना “नॅशनल कॅडेट कार्पोरेशन” (NCC) मध्ये सहभाग घेतला.

अमृतसरच्या शासकीय महाविद्यालय महाविद्यालयातून 1968 मध्ये इंग्रजीतून पदवी संपादन केली.

पंजाब विद्यापीठातून 1970 मध्ये किरण बेदी यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

दिल्ली विद्यापीठातून 1988 मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

किरण बेदी यांनी आयआयटी दिल्ली मधून 1993 मध्ये सायन्स मध्ये पीएचडी केली. ड्रग्स, अब्युज आणि डोमेस्टिक हिंसाचार या विषयावर प्रबंध लिहिला.

अमृतसरच्या खालसा कॉलेज फॉर वूमन मध्ये पॉलिटिकल सायन्सच्या प्राध्यापिका म्हणून किरण बेदी यांनी नोकरीला सुरुवात केली.

1 जुलै 1972 मध्ये भारतीय पोलीस दलात पहिला महिला अधिकारी म्हणून प्रवेश केलेल्या किरण बेदी यांची ओळख निर्माण झाली.

किरण बेदी यांचे वैवाहिक जीवन (Kiran Bedi Marriage)

9 मार्च 1972 मध्ये किरण बेदी यांनी टेनिस खेळाडू “ब्रिज बेदी” यांच्याशी विवाह झाला.

या दांपत्याचे प्रथम भेट ही टेनिस कोर्ट वरच झाली होती. 1975 मध्ये सायना बेदी ही किरण बेदी यांची मुलगी आहे.

2016 मध्ये किरण बेदी यांच्या पतीचे कर्करोगाने मृत्यू झाला.

किरण बेदी एक टेनिसपटू

वडिलांच्या प्रेरणेने वयाच्या नवव्या वर्षापासून किरण बेदी यांनी टेनिस खेळायला सुरुवात केली आणि 1964 पासून टेनिसपटू म्हणून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली.

जूनियर नॅशनल लॉन टेनिस स्पर्धा 1966 मध्ये किरण बेदी यांनी जिंकली. 1968 मध्ये अखिल भारतीय हस्तक्षेप टेनिसचे विजेते पद मिळाले.

1975 रोजी अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धा किरण बेदी यांनी जिंकली.

राष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धा 1976 मध्ये जिंकली.

1973 मध्ये लिओनल फोन्सेका मेमोरियल ट्रॉफी जिंकून श्रीलंके विरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व किरण बेदी यांनी केले आहे.

किरण बेदी यांचा पोलीस करियरचा प्रवास

किरण बेदी या लहानपणापासूनच एक अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या. पण त्यांना लहानपणापासून टेनिस खेळण्याची आवड होती.

पुण्यामध्ये झालेल्या आशिया खंडातील “महिला टेनिस चॅम्पियनशिप” 1972 मध्ये किरण बेदी यांनी हे स्पर्धा जिंकली.

त्यावेळेस त्यांना भारतीय पोलीस अकॅडमी मध्ये प्रवेश मिळाला होता आणि पहिली महिला आयपीएस बनवून इतिहास रचला.

1974 मध्ये पोलीस अधिकारी म्हणून किरण बेदी यांनी पोलीस सेवेमध्ये रुजू झाल्या.

पोलीस सेवा करत असताना किरण बेदी यांनी महत्त्वाची पदे सांभाळली आहे.

अरुणाचल प्रदेश गोवा मिझोरम या केंद्रशासित प्रदेशामध्ये संवर्गातील 80 पुरुषांमध्ये एकमेव महिला म्हणजे किरण बेदी होत्या आणि तो एक अभिमानाचा क्षणच होता.

इंडिया गेट दिल्ली येथे 1977 मध्ये अकाली आणि निरंकारी यांच्यात ज्या पद्धतीने झालेल्या शीख उठावावर त्यांनी चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवले.

पश्चिम दिल्लीच्या 1979 मध्ये डीसीपी पोलीस किरण बेदी होत्या.

पश्चिम दिल्लीमध्ये गुन्हेगारी नियंत्रणासाठी पुरेसे अधिकारी नव्हते पण त्यांनी गावकऱ्यांना स्वावलंबी बनवले होते.

पोलिसांना गस्त घालण्यास मदत करण्यासाठी त्यांनी बरीच पोलीस दल तयार केली होती.

किरण बेदी यांनी दिल्लीत ट्राफिक डीसीपी म्हणून कार्यभार स्वीकारला. शहरातील रहदारी व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी त्यांनी अनेक कामे हाती घेतले.

बेकायदा पार्किंग विरुद्ध कायदे केले आणि त्याचबरोबर क्रीम सुरु करण्याचे श्रेय किरण बेदी यांना जाते.

त्यांच्या या कामावरूनच लोक त्यांना त्या काळामध्ये क्रेन बेदी देखील म्हणत असत.

ट्रॅफिक डीएसपी म्हणून 1983 मध्ये किरण बेदी यांचे गोव्यात बदली झाली.

त्यांची ही बदली देशाच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि आर के के धवन यांच्यासह काही उच्च अधिकाऱ्यांनी केली होती.

नवी दिल्ली येथे रेल्वे संरक्षण दलात 1984 मध्ये उप कमांडर म्हणून किरण बेदी यांची नेमणूक झाली.

त्याचवेळी त्यांनी औद्योगिक विकास विभागात उपसंचालक म्हणून काम पाहिले होते.

दिल्लीतील पोलीस मुख्यालयाचा 1985 मध्ये किरण बेदी यांनी कार्यभार स्वीकारला होता.

किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीएसपी म्हणून 1986 मध्ये काम पाहिले होते.

मिझोरम मध्ये उपमहानिरीक्षक म्हणून 1990 मध्ये किरण बेदी यांनी काम पाहिले होते 1993 मध्ये दिल्लीचे आयजी झाले.

किरण बेदी यांचे शेवटचे पोस्टिंग 2005 मध्ये भारतीय पोलीस संशोधन व विकास विभागाच्या महासंचालक कार्यालय मध्ये केली होती.

वैयक्तिक कारणे सांगून 2007 मध्ये किरण बेदी यांनी पोलीस सेवेतून राजीनामा दिला.

एक भारतीय समाजसेवक राजकारणी टेनिसपटू आणि निवृत्त पोलीस अधिकारी म्हणजे किरण बेदी आहेत.

किरण बेदी राजकीय कारकीर्द

एक पोलीस अधिकारी आणि परोपकारी तसेच एक कणखर आणि निडर राजकारणी किरण बेदी आहेत.

किरण बेदी यांनी भाजपमध्ये 2015 रोजी प्रवेश केला. त्याच वर्षी त्यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या बाजूने मुख्यमंत्र्याचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

कृष्णा नगर मतदार संघातून आप पक्षाचे उमेदवार एस .के. बग्गा यांचा 2277 मतांनी पराभव केला.

22 मे 2016 मध्ये किरण बेदी यांनी केंद्रशासित प्रदेश पद्दूचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आले आणि तिथेच त्या सध्या कार्यरत आहेत.

किरण बेदी पुरस्कार (Kiran Bedi Awards)

किरण बेदी यांना “एनसीसी कॅडेट” अधिकारी या पुरस्काराने 1968 मध्ये सन्मानित करण्यात आले होते.

1972 रोजी किरण बेदी यांना देशातील “पहिला महिला आयपीएस अधिकारी” होण्याचा मान मिळाला होता.

राष्ट्रीय महिला लॉन टेनिस स्पर्धेचे 1976 मध्ये किरण बेदी यांनी विजेतेपद जिंकले.

अकाली आणि निरंकारी संघर्षाच्या वेळी हिंसाचार रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली म्हणून 1979 मध्ये किरण बेदी यांना राष्ट्रपती बहादुरी पुरस्काराने सन्मानित केले होते.

किरण बेदी यांना ” वुमन ऑफ द इयर” या पुरस्काराने 1980 मध्ये सन्मानित करण्यात आले.

1994 रोजी उत्कृष्ट शासकीय सेवेबद्दल किरण बेदी यांना “ रॅमन मॅगसेसे” पुरस्काराने गौरवण्यात आले.

1995 मध्ये लायन्स क्लब ने सामुदायिक सेवेसाठी किरण बेदी यांना लायन्स क्लब ऑफ द इयरचा पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

2005 मध्ये “अखिल भारतीय ख्रिश्चन कौन्सिल फॉर रीफॉरम इन जेल अँड पेनल सिस्टम अँड सोशल जस्टीस “ तर्फे किरण बेदी यांना मदर टेरेसा मेमोरियल नॅशनल अवॉर्ड देण्यात आला होता.

2006 मध्ये द वीकच्या माध्यमातून देशातील सर्वाधिक प्रशांत महिला म्हणून किरण बेदी यांना गौरविण्यात आले होते.

2009 मध्ये आज तक टीव्ही वाहिनीने किरण बेदी यांना महिला उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केले होते.

किरण बेदी यांना 2013 मध्ये विद्यापीठाने ”डॉक्टर ऑफ पब्लिक सर्विस अवॉर्ड” डॉक्टरेट पदवी प्रदान केली.

सामाजिक प्रभाव पाडल्याबद्दल 2014 मध्ये किरण बेदी यांना ” लॉरियल पॅरिस फेमिना महिला” पुरस्काराने सन्मानित केले.

FAQ on Kiran Bedi Information in Marathi

किरण बेदी कधी आयपीएस (IPS) झाल्या?

किरण बेदी 1972 मध्ये आयपीएस (IPS) झाल्या.

पहिली महिला पोलीस अधिकारी कोण आहे?

पहिली महिला पोलीस अधिकारी किरण बेदी आहे.

किरण बेदी यांचा जन्म कुठे झाला?

किरण बेदी यांचा जन्म अमृतसर, पंजाब झाला.

किरण बेदी यांचा जन्म कधी झाला?

किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 झाला.

किरण बेदी यांच्या आईचे नाव काय आहे?

किरण बेदी यांच्या आईचे नाव प्रेमलता पेशावरिया आहे.

किरण बेदी यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

किरण बेदी यांच्या वडिलांचे नाव आकाश लाल पेशावरिया आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Kiran Bedi Information in Marathi, Kiran bedi Biography in Marathi, किरण बेदी मराठी माहिती, Kiran Bedi history in Marathi, Kiran Bedi Birth, Kiran bedi family, Kiran bedi Marriage, Kiran Bedi Education, Kiran Bedi Family, Kiran Bedi Awards, किरण बेदी जीवनचरित्र, माहिती, निबंध, किरण बेदी पोलीस कारकीर्द, किरण बेदी शिक्षण सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा