पुरंदर किल्ला माहिती मराठी | Purandar Fort Information in Marathi

Purandar Fort Information in Marathi पुरंदर किल्ला माहिती मराठी [Purandar Fort Information in Marathi](Purandar Fort History in Marathi, Purandar fort mahiti marathi, Purandar fort trek, map, Height) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पुरंदर हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ वसलेला हा एक किल्ला आहे.

पुरंदर किल्ल्याचे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे येथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता.

पुरंदर किल्ला हा विस्ताराने खूप मोठा आहे.

पुरंदर किल्ला माहिती मराठी (Purandar Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)पुरंदर किल्ला
उंची (Height) 1390 मीटर (4472 फुट)
प्रकार (Type) गिरिदुर्गगिरिदुर्ग
ठिकाण (Place) पुणे
जवळचे गाव (Nearest Village) जुन्नरसासवड
स्थापना 1350
चढाईची श्रेणी सोपी
Purandar Fort Information Marathi

पुरंदर किल्ल्याचा इतिहास (History of Purandar Fort)

पुरंदर चा अर्थ इंद्र असा होतो. ज्याप्रमाणे इंद्रदेवाची स्थान बलाढ्य तसेच पुरंदर किल्ला बलाढ्य आहे.

पुराणात या किल्ल्याची किंवा डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत होते.

असे म्हटले जाते की हनुमानाने जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होते तेव्हा द्रोनागिरी पर्वताचा काही भाग पडला तोच हा इंद्रनील पर्वत होय.

बहामनी काळात बीदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या आदेशांवर पुरंदर किल्ला ताब्यात घेतला.

त्यांनी पुरंदर किल्ल्याचे पुनर्निर्माण करण्यास सुरुवात केले.

पुरंदर किल्ल्याचे पुननिर्माणाचे काम त्याच घराण्यातील महादजी नीलकंठ यांनी सुरुवात केली होती.

किल्ल्यावरील शेंद्रा बुरुज बांधतांना नेहमी ढासळत असे.

तेव्हा बाहिरनाक सोननाक यांनी आपले पुत्र नाथनाक आणि सून देवाकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली आणि त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला असे म्हटले जाते.

पुरंदर किल्ला सन 1489 च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहमद याने जिंकून घेतला.

नंतर किल्ला 1550 मध्ये आदिलशाहीच्या ताब्यात आला.

1649 मध्ये आदिलशाहीने शहाजी महाराजांना कैदेत टाकले.

त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले स्वराज्यात आणले होते.

म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास ही मोहीम सोपावली होती.

छत्रपती महाराजांवर दोन्हीकडून संकट आले होते एकीकडे आपले वडील आणि दुसरीकडे स्वराज्य यांच्यावर संकट आले होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईसाठी पुरंदर किल्ला निवडला होता.

पण पुरंदर किल्ला हा मराठ्यांकडे नव्हता. तेव्हा हा किल्ला महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात होता.

त्यांच्या भावाभावांमधील वादविवाद यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर प्रवेश करण्यात यश मिळवले.

पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने फत्तेखानावर यश मिळवणे सोपे झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या लढाईत हे मोठे यश प्राप्त झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्यावर नेताजी पालकर यांना सरनौबत केले होते.

वैशाख शु. 12 शके 1579 म्हणजेच 14 मे 1657 गुरुवार या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला.

पुरंदरचा तह

1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंग यांनी औरंगजेबेचा आज्ञावर पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि मिर्झाराजा जयसिंग याला दिलेरखानाने मदत केली.

किल्लेदार म्हणून नियुक्त असलेल्या मुरारबाजी देशपांडे यांनी मोगल सैन्य विरुद्ध जोरदार प्रतिकार केला आणि त्यांना या लढाईमध्ये मरण आले.

छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी माहित झाल्या बरोबर महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांचेशी तहाची बोलण्याची सुरुवात केली.

11 जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले.

पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले दिले त्याची यादी पुढील प्रमाणे आहेत.

पुरंदर किल्लारुद्रमाळ किल्लाकोंढाणा किल्ला किंवा सिंहगड किल्लारोहिडा किल्ला
लोहगड किल्लाविसापूर किल्लातुंग किल्लातिकोना किल्ला
प्रबळगड किल्लामाहुली किल्लामनरंजन किल्लाकोहोज किल्ला
कर्नाळा किल्लासोनगड किल्लापळसगड किल्लाभण्डारगड किल्ला
नरदुर्ग किल्लामार्गगड किल्लावसन्तगड किल्लानंगगड किल्ला
अंकोला किल्लाखिरदुर्ग किल्ला (सागरगड)मानगड किल्ला

पुरंदर गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे (Places to See on Purandar Fort)

बिनी दरवाजा

पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा आहे.

नारायणपूर गावातून जाताना बिनी दरवाजा लागतो. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या लागतात.

वीर मुरारबाजी देशपांडे

बिनी दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे आपल्याला मुरारबाजी यांचा पुतळा दिसतो.

हा पुतळा 1970 मध्ये उभारण्यात आला.

पद्मावती तळे

मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्यापासून थोडे समोर गेल्यावर आपल्याला पद्मावती नावाचे तळे लागते.

शेन्दर्‍या बुरूज

पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या दिशेने तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याच बुरुजाचे नाव शेन्दर्‍या बुरूज आहेत.

पुरंदरेश्वर मन्दिर

बिनी दरवाजातून सरळ पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते ते म्हणजे पुरंदरेश्वर मंदिर होय.

हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिराच्या आत इंद्राची सव्वा ते दीड फुटापर्यंतची मूर्ती आहे.

हे साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराची पुनर्बांधणी केली.

रामेश्वर मन्दिर

पुरंदरेश्वर मंदिराच्या मागील भागात पेशवे वंशाचे रामेश्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते.

पेशव्यांचे वाड्यांचे अवशेष

या मंदिरापासून थोडे वरती गेल्यावर पेशव्यांचे दुमजली वाड्याचे अवशेष दिसतात.

हा वाडा पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला होता. या वाड्याच्या मागे एक विहीर सुद्धा आहे.

दिल्ली दरवाजा

वाड्यापासून सरळ बालेकिल्ल्याकडे गेल्यावर आपल्याला दिल्ली दरवाजा लागतो.

वाड्यापासून दिल्ली दरवाजा पर्यंत जाण्यासाठी आपल्याला सुमारे 15 मिनिटे लागतील.

दिल्ली दरवाजाच्या जवळच लक्ष्मी मातेचे मंदिर आहे.

खन्दकडा

दिल्ली दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे एक कडा लागतो जो सरळ पूर्वेकडे गेलेला आहे यालाच खंदकडा असे म्हणतात.

या कड्याच्या शेवटी एक बुरुज आहे.

केदारेश्‍वर मंदिर

केदार दरवाजा पाहून झाल्यावर सुमारे 15 मिनिटे चालत गेल्यावर काही पायऱ्या लागतात. त्या पायऱ्या सरळ आपल्याला केदारेश्वर मंदिर पाशी नेऊन पोहोचतात.

पुरंदर किल्ल्याचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्‍वर मंदिर होय.

केदारेश्वर मंदिर म्हणजे पुरंदर किल्ल्यावरील सर्वात उंच भाग आहे.

येथून आपल्याला राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्‍वर, रोहिडा, मल्हारगड, हे सर्व किल्ले आपल्याला पाहायला मिळते. 

कोकण्या बुरूज

केदार टेकडीच्या मागे एक बुरुजाचे नाव कोकण्या बुरूज असे आहे.

पुरंदर माची

दिल्ली दरवाजातून सरळ गेल्यावर आपण पुरंदर माची वर जाऊन पोहोचतो.

भैरवगड

पुरंदर माचीवरून आपण सरळ भैरव खिंडीत येऊन पोहोचतो.

याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. भैरव खिंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

FAQ on Purandar Fort Information in Marathi

पुरंदर किल्ला किती जुना आहे?

पुरंदर किल्ला 11व्या शतकातील यादव राजवटीचा आहे.

पुरंदर किल्ल्याच्या ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व काय आहे?

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म आणि पुरंदरचा तह

पुरंदरच्या तहात छत्रपति शिवाजी महाराजांनी किती किल्ले दिले?

23 किल्ले

पुरंदर किल्ल्याची स्थापना कधी झाली?

1350

निष्कर्ष

Purandar Fort Information in Marathi पुरंदर किल्ला माहिती मराठी [Purandar Fort Information in Marathi](Purandar Fort Information in Marathi, Purandar Fort History in Marathi, Purandar fort trek, map, Height) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा