सरोजिनी नायडू माहिती मराठी | Sarojini Naidu Information in Marathi

Sarojini Naidu Information in Marathi, सरोजिनी नायडू माहिती मराठी, सरोजिनी नायडू इन्फॉर्मेशन इन मराठी, Sarojini Naidu Awards, Sarojini Naidu Achievements, Sarojini Naidu Birth, Sarojini Naidu Death, Sarojini Naidu Biography in Marathi सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

सरोजिनी नायडू या महान कवयित्री आणि स्वातंत्र्य सैनिक होत्या.

स्वातंत्र्यानंतर भारताच्या उत्तर प्रदेश मधील पहिल्या महिला राज्यपाल म्हणून सरोजिनी नायडू होत्या.

सरोजिनी नायडू या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

सरोजिनी नायडू यांचे भाषण ऐकून मोठमोठे दिग्गज मंत्रमुग्ध होत असे.

इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या प्रेसिडेंट म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.

लहानपणापासून त्यांना कविता लिहिण्याचा छंद होता. भारताची कोकिळा म्हणून सरोजिनी नायडू यांची ओळख होती.

Table of Contents

सरोजिनी नायडू माहिती मराठी (Sarojini Naidu Information in Marathi)

नाव (Name)सरोजिनी नायडू
निकनेम (Nick Name)भारताची कोकिळा, नाइटीगेल ऑफ इंडिया
जन्म स्थान (Place of Birth)हैदराबाद
जन्म दिनांक (Date of Birth)13 फेब्रुवारी 1879
वय (Age)70 वर्ष
शिक्षण (Education)
आईचे नाव (Mother’s Name)वरदा सुंदरी देवी
वडिलांचे नाव (Father’s Name)अघोरनाथ चटोपाध्याय
पतीचे नाव (Husband’s Name)गोविंद राजूलू नायडू
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
मृत्यू (Death)2 मार्च 1949
Sarojini Naidu Information Biography Mahiti Marathi

सरोजिनी नायडू यांचा जन्म

13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद मध्ये सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चटोपाध्याय आणि आईचे नाव वरदा सुंदरी देवी होते.

बंगाली कुटुंबात सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. वडील वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षा शास्त्री आणि शिक्षक होते.

सरोजिनी नायडू यांच्या वडिलांनी हैदराबाद मध्ये निआज कॉलेजची स्थापना केली. क्रांतिकारी असलेले वीरेंद्र नाथ चटोपाध्याय हे सरोजिनी नायडू यांचे भाऊ होते.

वीरेंद्र नाथ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. वीरेंद्र नाथ यांना 1937 रोजी इंग्रजांनी मारून टाकले.

हरिश्चंद्रनाथ चटोपाध्याय हे सरोजिनी नायडू चे दुसरे भाऊ होते. त्यांचे भाऊ नाटक ,कथाकार, कलाकार आणि एक कवी सुद्धा होते.

सुनलीनी देवी हे सरोजिनी नायडू यांची बहीण होती. त्यांची बहीण एक अभिनेत्री आणि एक उत्तम नृत्यांगना होती.

सरोजिनी नायडूंचे शिक्षण (Sarojini Naidu Education)

एक अत्यंत हुशार विद्यार्थिनी असलेल्या सरोजिनी नायडू यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, फारसी आणि बांगला या भाषांचे ज्ञान होते.

वयाच्या 12 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा पास केले होती. त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांनी गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावे.

त्यांच्या आईकडून त्यांना कविता लिहिण्याचे प्रेरणा निर्माण झाले. सरोजिनी नायडू यांच्या कवितेने प्रत्येकाला साद घालत होते.

सरोजिनी नायडू यांनी एकदा गणिताच्या पुस्तकामध्ये 1300 ओळींची एक कविता लिहिली.

जे पाहून त्यांच्या वडिलांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याची एक प्रत तयार केले.

जी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले. विदेशात अध्यापनासाठी सरोजिनी नायडू यांना शिष्यवृत्ती दिली होती.

इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडन येथे वयाच्या 16 व्या वर्षी प्रवेश घेतला होता. तिथून पुढचे शिक्षण त्यांनी केंब्रिज ब्रिटन कॉलेज मधून प्राप्त केले.

सरोजिनी नायडू यांचा विवाह

इंग्लंडमध्ये भारताच्या महान कवयित्री जेव्हा शिक्षण घेत होत्या. त्यावेळी त्यांची भेट गोविंद राजूलू नायडूंशी झाले.

इंग्लंडमध्ये गोविंद हे फिजिशियन होण्याकरता गेले होते. त्या दोघांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत आल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या 19 व्या वर्षी विवाह झाला.

“ब्राह्मो मॅरेज ॲक्ट” अंतर्गत मद्रास मध्ये 1998 रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला.

त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह करण्यास मान्यता नव्हती. यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. 

सरोजिनी नायडूंच्या निर्णयाला समाजाची चिंता न करता त्यांच्या वडिलांनी त्यांना सहाय्य केले होते.

या अथक प्रयत्नानंतर त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले. विवाह नंतर सरोजिनी नायडू यांनी लिखाण सुरू ठेवले.

लिखाणामुळे त्यांच्या कवितांची लोकप्रियता वाढली. सरोजिनी नायडू यांना चार मुलं झाली.

रणधीर, पद्मजा, जय सूर्या आणि लीलामणी अशी चार मुले होते. पद्मजा या त्यांच्या आई सारख्या कवयित्री झाल्या आणि राजकारणात देखील उतरला.

1961 रोजी पश्चिम बंगालच्या गव्हर्नर झाल्या. बुलबुले हिंदी कविता 1905 रोजी प्रकाशित झाली.

त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढत गेली. सरोजिनी नायडू यांच्या कवितेच्या प्रशंसक यादीत जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर होते.

स्वातंत्र्यसैनिक सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू यांनी एके दिवशी गोपाळ कृष्ण गोखले यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी सरोजिनी यांना तुमच्या कवितेमध्ये क्रांतिकारी विषयांचा समावेश करण्याचा सल्ला दिला.

लहान भागातील लोकांना मुक्तीच्या लढाईत सामील होण्यासाठी प्रोत्साहन करणारे असे सुंदर शब्द वापरा असा सल्ला दिला.

1916 रोजी महात्मा गांधींना भेटल्यानंतर, त्यांचे विचार करण्याचा बदलला आणि स्वतःचे संपूर्ण आयुष्य हे देशाच्या मुक्तीसाठी समर्पित केले.

त्यानंतर सरोजिनी यांनी संपूर्ण देशाचा प्रवास सुरू केला. जिथे जिथे जात असत तिथे त्यांनी देशाच्या मुक्तीसाठी लोकांना प्रोत्साहन केले.

त्यांचे हृदय आणि आत्मा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी रोमांचित झाले. प्रामुख्याने देशातील महिलांना सरोजिनी यांनी जागृत केले.

त्या काळामध्ये स्त्रिया आपल्या रूढी परंपरा मध्ये गुंफलेल्या होत्या पण सरोजिनी यांनी हक्का बद्दल प्रोत्साहन केले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार सुरू केला. महिलांना लढाईमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. अनेक राज्ये, शहरे आणि गावामध्ये महिलांना प्रोत्साहन करत असत.

सरोजिनी नायडू यांचे कार्य

1919 रोजी इंग्लंडचा दौरा सरोजिनी नायडू यांनी अखिल भारतीय होमरूल लीगच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्या या नात्याने सुरू केला होता.

1925 च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद हे सरोजिनी नायडू यांनी कानपूर मध्ये भूषवले होते.

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत 1930 रोजी गुजरात मधील धारासना या ठिकाणी “मिठाच्या सत्याग्रहाचे” नेतृत्व सरोजिनी यांनी केले होते.

हैदराबाद मध्ये प्लेग महामारी मध्ये त्यांनी अथक परिश्रम घेऊन जनतेला मदत केली. या मदत कार्यासाठी त्यांना “कैसर- इ- हिंद” या सुवर्णपदकाने भूषवले गेले.

सरोजिनी यांनी हिंदू मुसलमान ऐक्य, स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि आपले जीवन कार्य आहे असे मानले होते.

1942 मध्ये “चले जाव चळवळ” सुरू होती.त्यावेळी सार्वजनिक यांचा महत्त्वाचा भाग होता. यामुळे त्यांना तुरुंगवास भोगाव लागला होता.

स्वतंत्र भारतातील व उत्तर प्रदेशच्या पहिला महिला राज्यपाल म्हणून 1947 रोजी सरोजिनी यांची नेमणूक झाली.

महिला दिन म्हणून सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस का साजरा केला जातो?

भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी सरोजिनी नायडू यांची जयंती राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केली जाते.

देशातील महिलांसाठी नेहमीच प्रेरणास्थान होत्या. स्वातंत्र्य चळवळीतील राजकीय कार्यकर्त्या तसेच कवयित्री म्हणून सरोजिनी नायडू यांची ओळख होती.

सरोजिनी यांना भारताचा कोकिळा म्हणून ओळखत असे.

महिलांच्या मुक्तीसाठी सखोलपणे समजून घेतले आणि हक्कासाठी प्रोत्साहन करण्याचे काम सरोजिनी नायडू यांनी केले.

“वुमन्स इंडियन असोसिएशन” ची स्थापना 1917 मध्ये सरोजिनी नायडू यांनी केली होती.

महिलांना मत आणि हक्क मिळवण्याचा अधिकार दिला. म्हणून सरोजिनी नायडू यांचा वाढदिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली पुस्तके

  • 1905 मध्ये सोनेरी उंबरठा हे पुस्तक प्रकाशित केले.
  • सरोजिनी यांचा कवितेचा संग्रह ”गोल्डन थ्रेसहोल्ड” या नावाने 1905 मध्ये प्रकाशित केले.
  • “द बर्ड ऑफ टाईम” आणि “दि ब्रोकन विंग्स” हे दोन संग्रह प्रकाशित झाले.
  • राजनैतिक विचारावर आधारित असलेले “वर्ड्स ऑफ फ्रीडम” हे पुस्तक प्रकाशित केले.
  • 1961 रोजी “द फेदर ऑफ द डॉन” हे पुस्तक सरोजिनी नायडू यांच्या कन्या पद्मजाने एडिट करून प्रकाशित केले.
  • सरोजिनीने वयाच्या बाराव्या वर्षी माहेरमुनेर लँग्वेज लेखन सुरू केले.
  • पर्शियन भाषेत लिहिलेले हे नाटक हैदराबादच्या किंग्डमच्या निजामाला प्रभावित केले.

त्यांच्या कवितासंग्रहाला इंग्लंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणे वाचकांनी पसंत केले होते. एक शक्तिशाली लेखिका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती.

सरोजिनी नायडू यांचा पुरस्कार आणि सन्मान (Sarojini Naidu Awards and Achievements)

सरोजिनी नायडू यांना प्लेग महामारी पासून वाचवल्याबद्दल ब्रिटिश सरकारने “कैसर -ए – हिंद” या पुरस्काराने सन्मानित केले.

भारत सरकारने त्यांच्या जयंतीनिमित्त 13 फेब्रुवारी 1964 रोजी 15 पैशांचे टपाल तिकीट जारी केले.

सरोजिनी नायडू यांना “नाइटीगेल ऑफ इंडिया” असे म्हटले जाते.

सरोजिनी यांच्या पुरस्काराच्या यादीमध्ये “द बर्ड ऑफ टाईम”,”द ब्रोकेन विंग्स, द गोल्डन थ्रेशोल्ड” , आणि “द स्पेक्टेड फ्लूट: सॉंग ऑफ इंडिया” या नावांचा समावेश होतो.

इंग्लंडमध्ये या पुस्तकांना देखील मोठ्या संख्येने वाचकांनी पसंत केलं. त्यामुळेच त्या एक शक्तिशाली लेखिका म्हणून ओळखले जाऊ लागले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आणि राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान झालेल्या पहिला महिला म्हणजे सरोजिनी नायडू होत्या.

सरोजिनीयांनी हिंदू मुस्लिम सहकाऱ्याच्या दूताचा दर्जा मोहम्मद अली जिना यांच्या चरित्राला दिला होता.

सरोजिनी नायडू यांचे निधन( Sarojini Naidu Passed Away in Marathi)

महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडू 2 मार्च 1949 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ मध्ये कार्यालयात काम करत असताना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्यातच त्यांचे निधन झाले.

माझ्या हातातून जोपर्यंत रक्त वाहत आहे तोपर्यंत मी स्वातंत्र्याचे ध्येय सोडणार नाही या गौरवशाली शब्दांनुसारच ते जगले.

सरोजिनी यांच्या बालपणीचे निवासस्थान त्यांच्या कुटुंबाने हैदराबाद विद्यापीठाला दिले होते.

विद्यापीठाने ललित कला आणि संप्रेषण शाळेचे नाव बदलून सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन असे नवीन नाव देण्यात आले.

सर्व भारतीय महिलांसाठी प्रेरणास्थान असलेले सरोजिनी नायडू एक मजबूत शक्तिशाली स्त्री होत्या.

FAQ on Sarojini Naidu Information in Marathi

सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव काय आहे?

सरोजिनी नायडू यांचे पूर्ण नाव सरोजिनी गोविंद नायडू आहे.

सरोजिनी नायडू कशासाठी प्रसिद्ध होत्या?

सरोजिनी नायडू या राजकीय कार्यकर्त्या, स्त्रीवादी, कवयित्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झालेल्या पहिल्या भारतीय महिला राज्यपाल नियुक्त झाले म्हणून प्रसिद्ध होत्या.

सरोजिनी नायडू या स्वातंत्र्यसैनिक कशा होत्या?

सरोजिनी नायडू यांनी नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या समर्थक, वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग असल्यामुळे या सर्व कारणांमुळे स्वातंत्र्यसैनिक होत्या.

सरोजिनी नायडू यांना नाइटिंगेल ऑफ इंडिया का म्हणतात?

सरोजिनी नायडू यांना भारत कोकिला किंवा नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जात असे. त्यांना नाईटिंगेल ऑफ इंडिया किंवा इंडियन कोकिला म्हटले गेले कारण त्यांच्या कविता कल्पनाशक्ती आणि भावनांनी भरलेल्या आहेत. त्या कवयित्री, वक्त्या आणि स्वातंत्र्यसैनिक, समतेच्या योद्धा आणि निसर्गप्रेमी होत्या.

सरोजिनी नायडू यांना किंग्ज कॉलेज लंडनमध्ये शिकण्याची संधी कशी मिळाली?

सरोजिनी नायडू यांना किंग्ज कॉलेज लंडनमध्ये शिकण्याची संधी शिष्यवृत्ती मुळे मिळाली

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत?

भारतातील पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू आहेत.

निष्कर्ष (Conclusion)

Sarojini Naidu Information in Marathi, सरोजिनी नायडू माहिती मराठी, सरोजिनी नायडू इन्फॉर्मेशन इन मराठी, Sarojini Naidu Awards, Sarojini Naidu Achievements, Sarojini Naidu Birth, Sarojini Naidu Death, Sarojini Naidu Biography in Marathi सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा