तोरणा किल्ला माहिती मराठी | Torna Fort Information in Marathi

Torna Fort Information in Marathi तोरणा किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतला होता.

तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड आहे.

पुणे पासून तोरणा किल्ल्याचे अंतर 60 किलोमीटर आहे.

तोरणा किल्ल्यावरुन रायगड किल्ला, लिंगाणा, राजगड किल्ला, पुरंदर किल्ला, सिंहगड किल्ला हे सर्वे गड दिसतात.

Table of Contents

तोरणा किल्ला माहिती मराठी (Torna Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)तोरणा किल्ला
उंची (Height) 1,403 मीटर (4,603 फूट)
प्रकार (Type)गिरिदुर्ग
ठिकाण (Place) वेल्हे तालुका, पुणे
जवळचे गाव (Nearest Village) वेल्हे
स्थापना 1470-1486
चढाईची श्रेणी मध्यम
सध्याची अवस्था चांगली
Torna Fort Information Marathi

तोरणा किल्ला इतिहास मराठी (Torna Fort History in Marathi)

तोरणा किल्ल्याचा इतिहास (Torna Fort History) सर्वांना माहीत असणे खूप आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वात पहिले तोरणा किल्ला जिंकला.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त 16 वर्षांचे होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले असे म्हटले जाते.

नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडाची पाहणी केली तेव्हा किल्ल्याचे विस्तार पाहून महाराजांनी याचे नाव प्रचंडगड असे ठेवले.

तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्त धनाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी उपयोगात आणला.

तोरणा किल्ला हा 13व्या शतकात बांधला असेल अशी मान्यता आहे.

तोरणा किल्ला हा शिव पंथ यांनी बांधले असे म्हटले जाते.

याचा पुरावा म्हणजे गडावरील काही लेण्यांचा आणि अवशेषांवरून असे दिसून येते की हा किल्ला शिव पंथ यांचा आश्रम असावा.

इ. स. 1470 ते 1486 च्या काळात बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून घेतला.

पुढे हा किल्ला निजामशाहीत आला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला याच्यावर काही इमारती बांधल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर अनेक किल्ल्याची पुनर्बांधणी केली.

त्यात महाराजांनी 5000 होन इतकी रक्कम तोरणा गडावर खर्च केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तोरणा किल्ला मुघलांकडे गेला.

शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा किल्ला परत स्वराज्यात आणला.

इसवी सन 1704 मध्ये औरंगजेब बादशहाने तोरणा किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला जिंकून घेतला.

औरंगजेब बादशहाने तोरणा गडाचे नाव बदलून त्याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले.

औरंगजेब बादशहाने तोरणा किल्ला असा एकमेव किल्ला आहे जो लढाई करून जिंकलेला आहे.

इसवी सन 1708 मध्ये सरनोबत नागोजी कोकाटे यांनी तोरणा गडावर लोक चढवून हा किल्ला स्वराज्यात आणला.

यानंतर तोरणा किल्ला कायम स्वराज्यातच राहिला.

पुरंदरच्या तहात पण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता.

तोरणा गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे (Places To See on Torna Fort)

बिनी दरवाजा

तोरणा गडावर जातांना पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा आहे.

तोरणा दरवाजा

बिनी दरवाजातून आत गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या पायऱ्या सरळ तोरणाचा दरवाजाकडे जातात.

मेंगाई देवीचे मंदीर

तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे.

झुंजार माची

झुंजार माचीवरून आपल्याला रायगड, लिंगाणा, राजगड, पुरंदर किल्ला, सिंहगड हे किल्ले दिसून येतात.

कोकण दरवाजा

झुंजार माचीवरून बुधला माचीकडे जाताना कोकण दरवाजा लागतो.

बुधला माची

कोकण दरवाजा आपल्याला बुधला माचीकडे जाता येते.

तोरणा किल्ला ट्रेक (Torna Fort Trek)

तोरणा किल्ल्यावर ट्रेक करून जाण्यास सुमारे 3 तास लागतो.

तोरणा किल्ल्यावरची ट्रेक जास्त कठीण नाहीये.

पुण्याहून बसने तोरणा किल्ल्यावर कसे जायचे? (How to reach Torna Fort from Pune)

तोरणा येथे जाण्यासाठी प्रथम वेल्हे नावाच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरून, ‘स्वारगेट – वेल्हे – घिसर’ मार्गाने राज्य परिवहन बस पकडा.

ही बस तुम्हाला सुमारे 1 तास 45 मिनिटांत वेल्हे येथे सोडते.

किल्ल्यासाठी सकाळी लवकर सुरुवात करणे चांगले होईल.

मुंबईहून बसने तोरणा किल्ल्यावर कसे जायचे? (How to reach Torna Fort from Mumbai)

मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी ट्रेन किंवा बस पकडता येते.

स्वारगेट बसस्थानक (पुणे) येथून, ‘स्वारगेट-वेल्हे-घिसर’ मार्गाने जाणारी राज्य परिवहन बस पकडा आणि तोरणा किल्ल्याच्या पायथ्याजवळ असलेल्या वेल्हे येथे उतरा.

तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे २ तास लागतात.

FAQ on Torna Fort Information in Marathi

तोरणा किल्ला कुठे आहे?

वेल्हे तालुका, पुणे

प्रचंडगड या नावाने कोणता किल्ला ओळखला जातो

तोरणा किल्ला

शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला?

तोरणा किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कधी जिंकला?

इसवी सन 1647

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला तेव्हा ते किती वर्षाचे होते?

17 वर्षाचे

निष्कर्ष

Torna Fort Information in Marathi तोरणा किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा