तुंग किल्ला माहिती मराठी | Tung Fort Information in Marathi

Tung Fort Information in Marathi, तुंग किल्ला माहिती मराठी [Tung Fort Information in Marathi](Tung fort History in marathi, Tung Fort from Pune, Tung Fort Height, tung fort trek difficulty level) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लोणावळा जवळील एक किल्ला आहे.

11 जून 1665 रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा जय सिंगाला दिलेल्या 23 किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता.

तुंग किल्ला लोणावळ्यापासून २४ किमी अंतरावर, पुण्यापासून ६७ किमी, मुंबईपासून १२१ किमी आणि लोहगड किल्ल्यापासून ३१ किमी अंतरावर आहे.

पवन मावळातील किल्ल्यामधून लोहगड, विसापूर, तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.

तुंग किल्ला माहिती मराठी (Tung Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)तुंग किल्ला
उंची (Height) 3,527 फुट (1,075 मी)
प्रकार (Type) गिरिदुर्ग
ठिकाण (Place) पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव (Nearest Village) तुंगवाडी
स्थापना(Built) 1600
कोणी बांधलाआदिल शाही घराणे
सध्याची स्थिती व्यवस्थित
चढाईची श्रेणीसोपी
Tung Fort Information history map mahiti Marathi

तुंग किल्ला इतिहास मराठी (Tung Fort History in Marathi)

तुंग किल्ला हा 1600 च्या आधी बांधला गेला असावा असे म्हटले जाते.

तुंग किल्ला बांधण्याचे काम आदिलशाही घरांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला स्वराज्य मध्ये आणला.

हा किल्ला जास्त मोठा नसून एके वेळी 200 सैनिकांपेक्षा जास्त सैनिक किल्ल्या वर राहू शकत नाही.

तुंग किल्ल्याला कठीणगड म्हणून सुद्धा ओळखले जाते.

त्याचा आकार आणि रचना असे सूचित करते की त्याचे मुख्य कार्य पुणे शहराच्या रस्त्याचे रक्षण करणार्‍या पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे लक्ष देणारा टेहळणी बुरूज होता.

मावळ भागातील देशमुखांपैकी एक असलेल्या ढमाले कुटुंबावर तुंग किल्ल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती.

आक्रमणादरम्यान, हे आक्रमणकर्त्यांसाठी तात्पुरते लक्ष विचलित करण्याचे काम करत असायचे.

त्यामुळे विसापूर आणि लोहगड या प्रमुख किल्ल्यांवरील सैनिकांना आक्रमण करणाऱ्या सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होण्यास वेळ मिळायचे.

1665 मध्ये राजा जयसिंगाने या प्रदेशावर स्वारी केली.

दिलरखान आणि इतरांनी तुंग तिकोनाच्या आजूबाजूची गावे उध्वस्त केली, परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत.

कुबद खान सोबत हलालखान व इतरांसह १८ जून १६६५ रोजी तुंग किल्ला ताब्यात घेतला.

नंतर काही दिवसांनी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा स्वराज्यात आणून घेतला होता.

इसवी सन 1818 पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

 तुंग किल्ल्यामुळे लोहगड आणि विसापूर किल्ला आक्रमण  होण्याच्या आधी माहिती व्हायचे.

त्यामुळे लोहगड आणि विसापूर किल्ल्यावर रसद पोहोचणे फार सोपी व्हायचे.

गणेश दरवाजा

किल्ल्याचा प्रवेशद्वार म्हणजेच गणेश दरवाजा हे आहे. हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे

हनुमान दरवाजा

गणेश दरवाजाच्या आत मध्ये गेल्यावर आपल्याला लागतो तोच हनुमान दरवाजा आहे.

दरवाजाच्या नावाप्रमाणेच आपल्याला या दरवाज्याजवळ हनुमान जी यांची मूर्ती कोरलेली दिसते.

दरवाजामध्ये सैनिकांच्या राहण्यासाठी देवडी आहे.

गणेश मंदिर

सदरेच्या समोर आपल्याला गणेश मंदिर दिसते.

सदर

सदरचे फक्त आता अवशेष ऊरलेले आहे.

पाण्याच्या टाकी

तुंग देवीच्या मंदिराच्या आधी आपल्याला पाण्याचे टाके दिसते. हे पाणी पिण्यायोग्य आहे.

वाड्याचे अवशेष

वाड्यांचे भक्ताचा अवशेष ऊरलेले आहे.

तुंग देवीचे मंदिर

तुंग देवीचे मंदिर गडाच्या सर्वात उंच टोकावर आहे.

तुंग किल्ला ट्रेक (Tung Fort Trek)

तुंग किल्ल्यावरील ट्रेक फार सोपी (Tung Fort Difficulty Level) आहे. परंतु तुम्ही जर पावसाळ्यात जात असाल तर सांभाळून जावे कारण की या किल्ल्यावर पायवाट खूप छोटी आहे.

तुंग किल्ल्यावर कसे जायचे?

ट्रेनने

जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर तुम्हाला लोणावळा पर्यंत यावे लागेल.

तुम्हाला मुंबई-पुणे मार्गावरून लोणावळा साठी अनेक ट्रेन भेटून जाईल.

नंतर तुम्ही लोणावळा स्टेशन उतरल्यावर तुम्हाला टॅक्सी घेऊन गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचावे लागेल.

विमानाने

जर तुम्हाला विमानाने जायचं असेल तर तुम्हाला पुणे येथे उतरावे लागेल.

नंतर पुण्यावरून तुम्हाला ट्रेन किंवा बस याच्यानी गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

FAQ on Tung Fort Information in Marathi

तुंग किल्ला कुठे आहे

तुंग हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लोणावळा जवळील एक किल्ला आहे.

तुंग किल्ला चढायला किती वेळ लागतो?

तुंग किल्ला चढायला 1 तास वेळ लागतो.

तुंग किल्ला कोणी बांधला?

तुंग किल्ला 1600 च्या आधी बांधला गेला. हे आदिल शाही घराण्याने बांधले होते.

तिकोना किल्ला चढायला सोपा आहे का?

तिकोना किल्ला हा पवना धरणाजवळ असलेला एक छोटा पण सुंदर किल्ला होता. तुम्ही हा किल्ला तासाभरात चढू शकता आणि ट्रेक नसलेल्यांना शिखरावर पोहोचण्यासाठी 1.30 तास लागू शकतात. तिकोना किल्ला वर चढणे सोपे आहे. बाले किल्याला जाण्यासाठी, तुम्हाला खूप उंच असलेल्या पायऱ्या चढून जावे लागते.

निष्कर्ष

Tung Fort Information in Marathi, तुंग किल्ला माहिती मराठी [Tung Fort Information in Marathi](Tung fort History in marathi, Tung Fort from Pune, Tung Fort Height, tung fort trek difficulty level) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा