बाबा आमटे माहिती मराठी | Baba Amte Information in Marathi

Baba Amte Information in Marathi, बाबा आमटे माहिती मराठी, Baba Amte Biography in Marathi, Baba Amte information in Marathi, Baba Amte history in Marathi, Baba Amte Birth, Baba Amte education, Baba Amte personal life, Baba Amte career , Baba Amte Thoughtsबाबा आमटे जीवनचरित्र, बाबा आमटे जन्म , बाबा आमटे शिक्षण , बाबा आमटे कारकीर्द सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

एक महान मानवतावादी आणि ज्येष्ठ समाजसेवक असलेले डॉ बाबा आमटे आहेत.

बाबा आमटे यांच्या बद्दल लहानपणी पुस्तकात वाचला असेल. त्यांचे जीवन चरित्र अनेक पुस्तकांमध्ये छापावे अशीच आहे.

बाबा आमटे यांची समाजसेवेमधील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे.

मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचे पूर्ण नाव पण लोक त्यांना डॉ. बाबा आमटे याच नावाने ओळखतात.

कुष्ठरोग्यांची सेवा आणि गोरगरिबांची व्यथा एकुन त्यांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आहेत.

बाबा आमटे यांनी महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचा आणि शब्दांचा प्रभाव पडला आणि भारताच्या स्वातंत्र्याचा लढा मध्ये सहभागी होण्यासाठी आपला फायदेशीर वकिली सोडली.

बाबा आमटे यांनी आपले जीवन इतरांना मदत करण्यासाठी केले होते. त्यांचे एक ब्रीदवाक्य होते काम बांधते ; धर्मादाय नष्ट करते. या वाक्यानुसार जगत होते.

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना समाजाचा दृष्ट नजरेतून बाहेर काढण्यासाठी मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यांना आधार मिळवून दिला.

कुष्ठरोगांचा विचार करणे आणि उपचारासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे हे त्यांना गरजेचं वाटत होतं.

रॅमन मॅगसेसे पुरस्कार , टेम्पल्टन पुरस्कार आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेले बाबा आमटे आहेत.

आज या लेखात आपण बाबा आमटे माहिती मराठी पाहणार आहोत.

बाबा आमटे माहिती मराठी (Baba Amte Information in Marathi)

नाव (Name)मुरलीधर देवीदास आमटे
निकनेम (Nick Name)बाबा आमटे
जन्म स्थान (Place of Birth)हिंगणघाट, वर्धा
जन्म दिनांक (Date of Birth)26 डिसेंबर 1914
वय (Age)
शिक्षण (Education)
आईचे नाव (Mother’s Name)लक्ष्मीबाई आमटे
वडिलांचे नाव (Father’s Name)देविदास आमटे
पत्नीचे नाव (Wife’s Name)
राष्ट्रीयत्व (Nationality)
मृत्यू (Death)
Baba Amte Information Biography Awards Mahiti Marathi

बाबा आमटे यांचा जन्म (Baba Amte birth)

26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा मध्ये हिंगणघाट या गावांमध्ये बाबा आमटे यांचा जन्म झाला.

त्यांच्या वडिलांचे नाव देविदास आमटे आणि त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आमटे आहे. डॉ. विकास आमटे हे बाबा आमटे यांचे भाऊ आहेत.

बाबा आमटे यांचे वडील देविदास हे स्वातंत्र्यपूर्वक ब्रिटिश प्रशासनातील एक शक्तिशाली नोकरशहा आणि वर्धा जिल्ह्यातून एक श्रीमंत जामीनदार होते.

त्यांचे आई वडील त्यांना बाबा या नावाने संबोधत.

लहानपणापासून बाबा आमटे यांच्याकडे बंदूक होती. ही बंदूक रानडुक्कर आणि हरणांचे शिकार करण्यासाठी वापरत असत.

बाबा आमटे शिक्षण (Baba Amte Education)

बाबा आमटे यांनी नागपूर मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

बाबा आमटे यांना डॉक्टर बनावे असे वाटत होते. पण त्यांच्या वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले.

1940 सालामध्ये बाबा आमटे यांनी वकिलीची पदवी पूर्ण केली. महाराष्ट्र राज्यातील वर्धा शहरातच त्यांनी वकिलीचा सराव सुरू केला.

बाबा आमटे यांनी 1949 ते 1950 मध्ये जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसी मुळे त्यांना करता येणारा कुष्ठरोगावरील उपचार आणि चिकित्सावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

बाबा आमटे यांचा विवाह (Baba Amte Marriage)

बाबा आमटे यांच्या पत्नीचे नाव साधनाताई आमटे असे आहे.

साधनाताईं गूळे शास्त्री यांना बाबा आमटे यांनी एका लग्न समारंभात वयस्कर नोकराला मदत करण्यासाठी लग्न समारंभ सोडून जाताना पाहिले.

साधना यांचे मदत करण्याची वृत्ती बाबा आमटे यांना भावली. त्यांनी विचार केला की साधना यांना आपली पत्नी म्हणून निवड करावी.

1946 मध्ये बाबा आमटे आणि साधनाताई गुळे शास्त्री विवाहंधनात अडकले.

प्रकाश आणि विकास आमटे ही त्यांची दोन मुले आहेत.

आनंदवन प्रकल्प (Aandavan Project)

आनंदवन म्हणजे सेवाभावी संस्था आहे.

कुष्ठरोग्यांना या संस्थेमध्ये आसरा दिला जातो आणि त्यांच्या वरती उपचार केले जातात.

त्या काळामध्ये समाजामध्ये कुष्ठरोग हा मोठ्या प्रमाणावर पसरत होता. कुष्ठरोग हा भयंकर आजार होता.

त्या काळामध्ये लोक असे समजत असत की आपण काहीतरी पाप केला असेल म्हणून आपल्याला हा कुष्ठरोग झाला अशी अंधश्रद्धा होती आणि या रोगावर त्यावेळी काही उपचार देखील नव्हते.

जे लोक कुष्ठरोगाने ग्रस्त होते त्यांना तुच्छ वागणूक मिळायची. सर्व पाहून बाबा आमटे यांनी दोघांसाठी स्वतःची एक वेगळी संस्था स्थापन केले.

कुष्ठरोगांवर उपचार करता येतील आणि त्यांना नवीन आयुष्य देता येईल.

1952 मध्ये वरोराजवळ बाबा आमटे यांनी आनंदवन या आश्रमाची स्थापना केली.

2 रुग्णालय 1 विद्यापीठ 1 अनाथाश्रम व अंध आणि मूकबधिर मुलांसाठी शाळा इत्यादी या आनंदवनात झाली.

2008 पर्यंत हे आनंदवन 176 हेक्टर पर्यंत असेलेले आणि या संस्थेमध्ये 3500 कुष्ठरोगावर उपचार केले जाते.

लोक बिरादरी प्रकल्प (Lok Biradari Project)

1973 मध्ये आदिवासींच्या विकासासाठी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यामधील हेमलकसा येथे बाबा आमटे यांनी लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला.

परिसरातील आदिवासी जमातींना मूलभूत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रुग्णालय बांधण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला.

मुलांना शिक्षण देण्यासाठी वसतिगृह असलेली शाळा आणि प्रौढ लोकांना कौशल्य आणि प्रशिक्षण देण्यासाठी एक केंद्र देखील बांधले.

हेमलकसा मध्ये प्राणी अनाथालय देखील आहे. आदिवासींच्या शिकारीमुळे अनाथ झालेल्या प्राण्यांची काळजी घेते.

बाबा आमटेंचे ॲनिमल पार्क असे नाव त्या अनाथालयाला दिलेले आहे.

या प्रकल्पाची जबाबदारी गेल्या 36 वर्षापासून बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे हे सांभाळत आहे.

भारत जोडो आंदोलन (Bharat Jodo Andolan)

1985 मध्ये राष्ट्रीय भारत जोडो आंदोलन बाबा आमटे यांनी सुरू केले. पूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा सुरू केली.

भारत देशात भडकलेल्या जातीय हिंसाराच्या विरोधात देशाला एकत्र आणून संपूर्ण देशांमध्ये शांतता आणि एकतेचा संदेश देणे हे त्यांचे ध्येय होते.

बाबा आमटे यांच्या सोबत 116 तरुण अनुयायी, 5042 च्या किलोमीटरच्या प्रवासाला निघाले.

त्या त्यांचे हे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले.

बाबा आमटे यांना मिळालेले पुरस्कार

  • 1971 मध्ये बाबा आमटे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • 1985 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • 1986 मध्ये बाबा आमटे यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले.
  • मानव अधिकार क्षेत्रात अतुल्य योगदानासाठी संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार 1988 मध्ये बाबा आमटे यांना मिळाला.
  • 1999 मध्ये गांधी शांती पुरस्कार बाबा आमटे यांना प्रदान करण्यात आला.
  • 1978 मध्ये राष्ट्रीय भूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • 1979 मध्ये जमनालाल बजाज अवॉर्ड बाबा आमटे यांना देण्यात आला.
  • 1980 मध्ये एन.डी. दिवान अवॉर्ड देण्यात आला.
  • 1993 मध्ये रामशास्त्री अवॉर्ड बाबा आमटे यांना मिळाला.
  • इंदिरा गांधी मेमोरियल ऑफ 1985 मध्ये बाबा आमटे यांना देण्यात आला.
  • 1987 मध्ये फ्रान्सिय मस्सियो प्लॅटिनम जुबली अवॉर्ड मिळाला.
  • 1987 मध्ये जीडी बिर्ला इंटरनॅशनल अवार्ड आणि मध्ये आदिवासी सेवक अवॉर्ड भारत सरकारने दिला.
  • 1997 मध्ये नागपूर मध्ये सारथी अवॉर्ड बाबा आमटे यांना देण्यात आला.
  • महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ 1997 मध्ये बाबा आमटे यांना नागपूर येथे देण्यात आला.
  • 1998 मध्ये कुमार गंधर्व पुरस्कार आणि बाई फुले अवॉर्ड मिळाला.
  • 1998 मध्ये आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र सरकारने बाबा आमटे यांना प्रदान केला.
  • 2004 मध्ये महाराष्ट्र भूषण अवॉर्ड महाराष्ट्र सरकारने दिला.

बाबा आमटे यांचा मृत्यु ( Baba Amte Death)

समाजसेवेचे कार्य बाबा आमटे यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले. कुष्ठरोग्यांसाठी बांधलेले आनंदवन ही संस्था त्यांच्या मेहनतीचे उदाहरण आहे.

9 फेब्रुवारी 2008 मध्ये वरोडा येथील निवासस्थाने रक्ताच्या कर्करोगांनी बाबा आमटे यांचे निधन झाले.

संपूर्ण भारताने आणि आनंदवनाने एक थोर समाजसेवक गमावले.

FAQ Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे यांचे खरे नाव काय ?

बाबा आमटे यांचे खरे नाव मुरलीधर देविदास आमटे आहे.

बाबा आमटे यांच्या संस्थेचे नाव काय ?

आनंदवन हे त्यांच्या संस्थेचे नाव आहे. या संस्थेमध्ये कुष्ठरोगावर उपचार केले जातात.

बाबा आमटे यांचा मृत्यू कधी झाला ?

९ फेब्रुवारी २००८ मध्ये बाबा आमटे यांचा मृत्यू झाला.

निष्कर्ष (Conclusion)

Baba Amte Information in Marathi, बाबा आमटे माहिती मराठी, Baba Amte Biography in Marathi, Baba Amte information in Marathi, Baba Amte history in Marathi, Baba Amte Birth, Baba Amte education, Baba Amte personal life, Baba Amte career , Baba Amte Thoughtsबाबा आमटे जीवनचरित्र, बाबा आमटे जन्म , बाबा आमटे शिक्षण , बाबा आमटे कारकीर्द सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा