छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी | Sambhaji Maharaj Information in Marathi

Chatrapati Sambhaji Maharaj Information in Marathi छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी, संभाजी महाराज इतिहास माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

छत्रपती संभाजी महाराजांना शिवबाचा छांवा आणि शंभूराजे या नावाने ओळखले जाते.

छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 210 लढाई केल्या व त्यामधील एकाही लढाईमध्ये पराजित झाले नाही.

छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी (Sambhaji Maharaj Information in Marathi) मध्ये वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

नाव (Name)छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले
लोकांनी दिलेली पदवीछत्रपती, छांवा
जन्म स्थान (Place of Birth)पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
जन्म दिनांक (Date of Birth)14 मे 1657
वय (Age)32
आईचे नाव (Mother’s Name)सईबाई
वडिलांचे नाव (Father’s Name)छत्रपती शिवाजी महाराज
राजघराणे भोसले
राज्याभिषेक20 जुलै 1680
राजधानीरायगड किल्ला
दूध आईधाराऊ पाटील गाडे
पत्नी (Wife Name)येसूबाई
मुले (Children Name)शाहू महाराज
चलनहोन, शिवराई
मृत्यू (Death)11मार्च 1689
Sambhaji Maharaj Information history wife son Marathi

Table of Contents

छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 (sambhaji maharaj birth date) रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.

पुरंदर किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचा

राजपुत्र असल्यामुळे संभाजी महाराजांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणाचे डावपेच त्यांना लहानपणापासूनच शिकवण्यात आले.

संभाजी महाराज दोन वर्षाचे असताना त्यांची आई म्हणजे राणी सईबाई यांचे निधन झाले.

त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावातील धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री संभाजी महाराजांची दूध आई बनली.

संभाजी महाराजांचा सांभाळ त्यांच्या आज्जी राजमाता जिजाऊ यांनी केला.

त्यांच्या सावत्र आई म्हणजे राणी पुतळाबाई यांनी त्यांच्यावर आई सारखेच प्रेम दिले.

पण त्यांची सावत्र आई राणी सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना आपल्या मुलासारखे वागवले नाही आणि तसेच संभाजी महाराजांच्या राजकारणात ढवळाढवळ करायचे.

त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना राजाराम महाराजांना छत्रपती बनवायचे होते.

अनेक ऐतिहासिक माहिती नुसार छत्रपती संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि पराक्रमी होते.

त्यांना अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते.

मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळावेत त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी सोबत नेले.

त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज फक्त नऊ वर्षांचे होते.

यावरून आपल्याला कळते की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सुटकेची मोहीम आधीच आखून ठेवली होती.

छत्रपती शिवाजी महाराज आग्राच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्या पर्यंतची धावपळ छत्रपती संभाजी राजांनी सोसू नये म्हणून त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेव्हण्याच्या घरी मथुरेला ठेवले.

छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर पोहोचल्यानंतर काही काळाने छत्रपती संभाजी महाराज पण राजगडावर येऊन पोहोचले.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला

छत्रपती संभाजी महाराज लग्न

छत्रपती संभाजी महाराजांचे लग्न जिवुबाईशी (Chatrapati Sambhaji Maharaj Wife Name in Marathi) झाला.

छत्रपती संभाजी महाराजांचे लग्न कधी झाले याची इतिहासामध्ये नोंद नाही आहे पण लग्न हे राजगडावर झाले आहे.

जर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचे लग्न कधी झालं जर माहित असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता.

मराठा प्रथेनुसार जिवुबाई चे नाव येसूबाई (Chatrapati sambhaji maharaj wife name in marathi) असे ठेवण्यात आले.

जिवुबाई ही पिलाजी राव शिर्के यांची कन्या होती.

पिलाजीराव शिर्के हे पहिले शक्तिशाली देशमुख राव राणा सूर्याजी सुर्वे यांच्या साठी काम करायचे.

सूर्याजी सुर्व्यांच्या पराभवानंतर पिलाजीराव शिर्के हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार स्वराज्यात येण्यास तयार झाले.

छत्रपती शिवाजी महाराज कसे शत्रूंच्या माणसांना सुद्धा स्वराज्य मध्ये आणायचे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

पिलाजीराव शिर्के स्वराज्यात आल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोकण किनारपट्टीवर स्वराज्य वाढवण्यास मदत झाली.

येसूबाई यांना दोन मुले झाली एका मुलीचे नाव भवानी बाई आणि दुसऱ्या मुलाचे नाव शाहू असे ठेवण्यात आले.

जे पुढे जाऊन मराठा स्वराज्याचे छत्रपती झाले.

छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 16 मे 1682 मध्ये रायगडावर झाला.

छत्रपती संभाजी महाराज तारुण्य

6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांनी राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.

पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आलेले प्रतिनिधी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मान्य नव्हते.

परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या विनम्र स्वभावाने आणि त्यांच्या ज्ञानाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 12 दिवसात राजमाता जिजाऊ यांचे निधन झाले.

राजमाता जिजाऊ यांची समाधी रायगडाच्या खाली पाचाड गावात वाड्याजवळ आहे.

त्यानंतर संभाजी महाराजांकडे मायेने लक्ष देणारे फक्त राणी पुतळाबाई राहिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती वाचा

छत्रपती संभाजी महाराज तरुण असताना दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा त्यांचे मतभेद होऊ लागले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता.

कारण अण्णाजी दत्तो हे राणी सोयराबाई सोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक कामात अडथळा टाकायचे.

राणी सोयराबाई यांना राजाराम महाराजांना छत्रपती करायचे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले.

परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे अनेकदा अंनाजी दत्तो सोबत मतभेद व्हायचे.

त्यामुळे अंनाजी दत्तो सोबत अनेक अनुभवी मानकरी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.

दरबारातील काही मानकरी लोक छत्रपती संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले त्याचे कारण म्हणजे अण्णाजी दत्तो हे होते.

त्यांच्या विरोधामुळे छत्रपती संभाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयआवर छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जाता आले नाही.

तसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीतीमध्ये अष्टप्रधानमंडळाने छत्रपती संभाजी महाराजांचे आज्ञा म्हणण्यास नकार दिला.

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना पाठवण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला

छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला.

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला

छत्रपती संभाजी महाराजांनी ‘नायिकाभेद’, ‘नखशिखा’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

नखशिखा हा ग्रंथ त्यांनी आपल्या पत्नी राणी येसूबाई यांच्या प्रेरणेने लिहिला.

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. 3 एप्रिल हा दिवस स्वराज्य साठी आणि पूर्ण जगासाठी काळा दिवस होता.

तेव्हा छत्रपती संभाजी महाराज पन्हाळा किल्ल्यावर बंदिवान होते.

असे म्हटले जाते की छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेर च्या वेळी भेटता आले नाही.

त्यावेळी राणी सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यासारख्या प्रभावशाली दरबारी आणि इतर मंत्र्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना गादीवर बसण्यापासून रोखण्यासाठी षड्यंत्र रचले.

राजाराम महाराजांना वयाच्या दहाव्या वर्षी 21 एप्रिल 1680 रोजी गादीवर बसविण्यात आले.

ही बातमी कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावरुन बाहेर निघण्याचा प्रयत्न केला आणि किल्लेदाराच्या वध करून 27 एप्रिल रोजी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

काही माहितीनुसार छत्रपती संभाजी महाराज जेव्हा पन्हाळा किल्ल्यावर होते तेव्हा अनोजी दत्त सोबत काही मंत्री मंडळांनी आणि हंबीरराव मोहिते यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

परंतु हंबीरराव मोहिते यांचा हा एक गनिमी कावा होता जो त्यांनी अण्णाजी दत्तो यांना कळू दिलं नाही आणि सोबत कवी कलश यांना सुद्धा वाचवले.

हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पूर्ण मंत्रिमंडळा पासून आणि अनाजी दत्तो पासून वाचवले.

नंतर अण्णाजी दत्तो यांना माफ करण्यात आले. 18 जून 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचा

20 जुलै 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराज सिंहासनावर बसले.

राजाराम महाराज, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई राणी सोयराबाई यांना कैद करण्यात आले.

या कटात सहभागी असलेल्या अण्णाजी आणि इतर मंत्र्यांना अटक करण्यात आली आणि काही लोकांना फाशी देण्यात आली किंवा बंदिस्त करण्यात आले.

अण्णाजींची मात्र काही काळानंतर सुटका झाली.

छत्रपती संभाजी महाराजांनी राजपुत्र अकबरास कोठे आश्रय दिला?

शहजादा अकबर जेव्हा स्वराज्यात येऊन पोहोचले तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपले काही लोक पाठवून त्याची व्यवस्था पाली जवळील सुधागड येथे केली.

जून 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हिरोजी फर्जंद याला शहजादा अकबराची भेट घेण्यास पाठविले.

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः शहजादा अकबर यांना भेटण्यात थोडा वेळ लावला.

तेव्हा अण्णाजी दत्तो आणि शिर्के कुळातील अनेक सदस्यांनी राजाराम महाराजांसाठी एक छोटेसे राज्य सोडण्याच्या बदल्यात अकबराला दख्खन देण्याचे वचन दिले.

परंतु या कटात सहभागी होण्यास अकबराने नकार दिला आणि या कटाबद्दल छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण माहिती दिली.

अण्णाजी दत्तो, त्यांचे भाऊ सोमाजी दत्तो, मोठ्या संख्येने अष्टप्रधान सदस्य आणि शिर्के कुटुंबातील सदस्यांना ऑगस्ट 1681 मध्ये त्वरीत फाशी दिली.

छञपती संभाजी महाराज फोटो (Chatrapati Sambhaji Maharaj Real Photo)

Sambhaji Maharaj Information history Marathi

छत्रपती संभाजी महाराज यांचे प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (छत्रपती संभाजी महाराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापतीहंबीरराव मोहिते
छांदोगामात्य कवी कलश
पेशवे निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव
चिटणीस बाळाजी आवजी
सुरनीस आबाजी सोनदेव
डबीर जनार्दनपंत
मुजुमदार अण्णाजी दत्तो
वाकेनवीस दत्ताजीपंत

छत्रपती संभाजी महाराज मुद्रा व दानपत्र

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||

छत्रपती संभाजी महाराज

याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे आणि आकाशाप्रमाणे अमर्याद आहे.

या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल.

छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा सर्वात श्रेष्ठ कोणीही नाही.

छत्रपती संभाजी महाराज लष्करी मोहिमा आणि संघर्ष

छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 210 युद्ध लढले आणि सर्वात मुख्य कौतुकाची बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराज कधी पराभव झाला नाही.

प्रत्येक युद्धामध्ये छत्रपती संभाजी महाराज नेहमी यशस्वी झाले, म्हणून त्यांना शिवबांचा छावा असे म्हटले जाते.

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर येथे आहे. तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. तुळापूर गावाचे पूर्वीचे नाव नांगरवास असे होते.

तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी तीन नद्यांचा संगमावर वसले आहे.

येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच संभाजी महाराजांची समाधी आणि कवी कलश यांची सुद्धा समाधी आहे.

FAQ on Sambhaji Maharaj Information in Marathi

छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय आहे?

येसूबाई

छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलांचे नाव काय आहे?

भवानी बाई, शाहू महाराज

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

पुरंदर किल्ला

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

14 मे 1657

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

20 जुलै 1680

छत्रपती संभाजी महाराजांच्या दूध आईचे नाव काय आहे?

धाराऊ पाटील गाडे

छत्रपती संभाजी महाराज किती वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले

2 वर्षाचे असताना

छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कुठे आहे?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर येथे आहे. तुळापूर हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. तुळापूर गावाचे पूर्वीचे नाव नांगरवास असे होते.

निष्कर्ष

Chatrapati Sambhaji Maharaj Information in Marathi छत्रपती संभाजी महाराज माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा