छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी | Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखत नसेल असं महाराष्ट्रात कोणी व्यक्ती नाही आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच स्वराज्य निर्माणाची चाहूल राजमाता जिजाऊ यांच्यामुळे झाली.

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी (Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi) मध्ये वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Table of Contents

छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी (Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi)

नाव (Name)छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले
लोकांनी दिलेली पदवीछत्रपती
जन्म स्थान (Place of Birth)शिवनेरी किल्ला
जन्म दिनांक (Date of Birth)19 फेब्रुवारी 1630
वय (Age)50
आईचे नाव (Mother’s Name)जिजामाता शहाजी राजे भोसले
वडिलांचे नाव (Father’s Name)शहाजीराजे भोसले
राजघराणेभोसले
राज्याभिषेक6 जून 1674
राजधानीरायगड किल्ला
पत्नी (Wife Name)सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई,
सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई
मुले (Children Name)छत्रपती संभाजी भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले
अंबिकाबाई, कमळाबाई
दीपाबाई, राजकुंवरबाई
राणूबाई, सखुबाई
चलनहोन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
मृत्यू (Death)3 एप्रिल 1680
Shivaji Maharaj Information history wife son coronation death Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण (Chatrapati Shivaji Maharaj Childhood)

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 (Chatrapati Shivaji Maharaj Birth Place Fort) रोजी झाला.

इतिहासाच्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदाचा मुद्दा होता.

तो वाद नंतर मिटला महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली.

दुसरी तारीख म्हणजे 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी कसे पडले?

एका आख्यायिकेनुसार राजमाता जिजाऊ यांनी शिवनेरी गडावरील शिवाई देवीला एक नवस मागितले की जर मला पुत्र झाला तर मी त्याचे नाव शिवाजी असे ठेवीन.

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खन मधील राज्यसत्ता आदिलशाही, निजामशाही आणि गोवळकोंडा यातील मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागली गेली होती.

शहाजीराजे भोसले (Chatrapati Shivaji Maharaj Father)

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी आदिलशाही निजामशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलत राहिली.

मात्र शहाजी राजांनी पुणे हे आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची लहानशी फौज नेहमी पदरी बाळगली.

शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या राज्यामध्ये एक सरदार म्हणून होते.

मलिक अंबर या निजामशाहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर 1636 मध्ये मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने अहमदनगर चाल करून अहमदनगर शहर आपल्या ताब्यात घेतले.

शहाजीराजे नंतर आदिलशहाच्या दरबारात सरदार म्हणून रुजू झाले.

आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. नंतर लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या.

राजमाता जिजाऊ (Chatrapati Shivaji Maharaj Mother)

छत्रपती शिवाजी महाराज 14 वर्षाचे असताना शहाजी राजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली.

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले.

निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.

अशा प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासमवेत पुणे शहराचा पुनर्विकास केला.

राजमाता जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगराने पुण्यातील शेतजमीन नांगरली, आणि पुणे शहराला पुन्हा पहिले सारखं केलं.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाऊवर होती.

छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षण (Chatrapati Shivaji Maharaj Education)

युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राज्यकारभार यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून मिळाले.

दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण त्यांना दादोजी कोंडदेव मलठणकर यांच्याकडून मिळाले.

परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण राजमाता जिजाऊ यांच्याकडून मिळाले.

राजमाता जिजाऊ यांच्या कडून युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले.

शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्य निर्माण करायची प्रेरणा आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे लग्न (Chatrapati Shivaji Maharaj Marriages)

राणी सईबाई (Chatrapati Shivaji Maharaj Wife Name) आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणातच 16 मे 1640 रोजी लाल महाल पुणे येथे झाला.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 10 वर्षाचे होते आणि सईबाई निंबाळकर या 7 वर्षाच्या होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांना चार मुले झालीत.

त्यातील पहिल्या तीन मुली होत्या आणि चौथे मुलगा होता.

सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज हे होते.

छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण माहिती वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सोयराबाई मोहिते हे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सोयराबाई मोहिते सोबत 1641 मध्ये झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे तिसऱ्या पत्नीचे नाव पुतळाबाई भोसले हे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न पुतळाबाई सोबत 1650 मध्ये झाले.

पुतळाबाई पालकर हे नेताजी पालकर यांच्या बहिण आहे. पुतळाबाई यांना कोणतेही मूल झाले नाही.

सकवारबाई गायकवाड या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि सकवारबाई गायकवाड यांचा लग्न 15 एप्रिल 1653 रोजी झाले.

राणी सगुनाबाई शिर्के या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सगुनाबाई शिर्के सोबत 1656 च्या आधी झाले.

राणी काशीबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न काशीबाई जाधव सोबत जानेवारी 1657 मध्ये झाले.

लक्ष्मीबाई विचारे ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी आहे.

लक्ष्मीबाई विचारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 8 एप्रिल1657 रोजी झाला.

गुणवंताबाई इंगळे ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठव्या पत्नी आहे.

गुणवंताबाई इंगळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 15 एप्रिल 1657 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराज वंशावळ (Chatrapati Shivaji Maharaj Family Tree in Marathi)

Chatrapati Shivaji Maharaj Family Tree

छत्रपती शिवाजी महाराज इतिहास मराठी (Chatrapati Shivaji Maharaj History in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र मध्ये कोणाला माहिती नसेल असे क्वचितच लोक असतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी मध्ये जाणून वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

स्वराज्याची पहिली मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1647 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या तोरणा गड जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते.

त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा उर्फ सिंहगड आणि पुरंदर किल्ला आपल्या ताब्यात घेऊन पुणे प्रांतावर पूर्णपणे आपले नियंत्रण मिळवले.

तोरणा गडावर छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले व त्या गुप्त धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला बांधण्यात केला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य वाढत असल्यामुळे आदिलशहाने त्यांना आळा घालण्यासाठी शहाजीराजांना अटक केली.

आदिलशाहीने फतेखान नावाच्या सरदाराला 5000 सैन्यासोबत पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांना आळा घालण्यासाठी पाठवले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी फते खानाचा पराभव पुरंदर किल्ल्यावर केला.

बाजी पासलकर यांनी फत्तेखानाचा पाठलाग करत सासवड पर्यंत आले आणि सासवडच्या लढाईत बाजी पासलकर यांना मरण आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली.

शहाजीराजे व राजमाता जिजाऊ यांची मुद्रा पारशी भाषेत होती.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा संस्कृत मध्ये आहे. या राजमुद्रा वरील मजकूर खालील प्रमाणे आहे.

Chatrapati Shivaji Maharaj Rajmudra

“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

छत्रपती शिवाजी महाराज

याचा असा अर्थ होतो की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तसेच शहाजी महाराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचीही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढतच जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक (Chatrapati Shivaji Maharaj Coronation)

शिवाजी महाराज यांनी आपल्या अनेक मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि संपत्ती मिळविली होती, परंतु औपचारिक पदवी नसतानाही, ते तांत्रिकदृष्ट्या मुघल जमिनदार किंवा विजापुरी जहागीरदाराचा बंडखोर मुलगा म्हणून ओळखल्या जात होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा वास्तविक राज्य करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नव्हता.

जर छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला असता तर दुसऱ्या मराठी राजांना आणि मुस्लिम शासकांना सुद्धा त्यांचा हुकुम म्हणावा लागला असता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी 1673 मध्ये सुरू झाली परंतु काही वादग्रस्त समस्यांमुळे राज्याभिषेक ला जवळजवळ 1 वर्ष उशीर झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये ब्राह्मण लोकांमध्ये वाद निर्माण झाला.

दरबारातील ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राजा म्हणून राज्याभिषेक करण्यास नकार दिला याचे कारण म्हणजे हा दर्जा फक्त हिंदू समाजातील क्षत्रिय वर्णासाठी राखीव होता.

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे फक्त क्षत्रिय धर्मातील व्यक्तीचा राजा म्हणून राज्याभिषेक केला जाऊ शकते आणि फक्त क्षत्रिय धर्मातील लोक हिंदू धर्माचे राजा म्हणून ओळखले जाऊ शकते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळ हे क्षत्रिय म्हणून मानले जात नव्हते आणि ते ब्राह्मण ही नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिकृतपणे व्हावा म्हणून त्यांना क्षत्रिय जाहीर केले तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी अडथळा आणणारे लोकांची तोंडे बंद करणे फार गरजेचे होते म्हणून अश्या पंडितांची गरज होती की जे राज्याभिषेक होण्यास मदत करेल.

विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही स्वराज्याची गरज पूर्ण झाली.

या पंडिताला गागाभट्ट नावाने मोठ्या प्रमाणात ओळखले जायचे.

ते त्याकाळी ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री फार प्रसिद्ध होते.

सुरवातीला काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले.

Chatrapati Shivaji Maharaj Coronation

छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्याभिषेक होण्यासाठी गागाभट्ट आणि ब्राह्मणांना त्यांचे मन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले.

उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात गागाभट्ट, बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता.

गागाभट्ट यांनी भोसले कुळाची वंशावळ मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे चे आहे हे सिद्ध केले.

अशा पुरावा नंतर गागाभट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास होकार दिला.

त्यासाठी गागाभट यांना दक्षिणाही देण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 (Chatrapati Shivaji Maharaj Coronation Date) रोजी राजगडावर करण्यात आला.

राज्याभिषेकाच्या दिवशी एक इंग्रज माणूस ईस्ट इंडिया कंपनीचा तो म्हणजे सर हेन्री ऑक्सेंडेन हे होय.

त्यांनी आपल्या डायरीमध्ये मुंबईमधून निघण्या पासून तर राज्यभिषेका पर्यंतचे पूर्ण संवाद लिहिला आहे.

अजून एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे ते म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद हे होय.

सभासद बखर यामध्ये राज्याभिषेकाचे वर्णन केले आहे.

त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे राज्याभिषेक (Chatrapati Shivaji Maharaj Second Coronation)

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाले हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

गागाभट्टाने केलेल्या राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी 24 सप्टेंबर 1674 (Chatrapati Shivaji Maharaj Coronation Second)रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते.

अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे.

त्यात असे म्हटले आहे की गागाभट्टाने केलेल्या राज्यभिषेका मध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांना भोगावे लागत आहेत.

त्यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडली, राणी काशीबाई यांचा मृत्यू आणि फक्त 12 दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे राजमाता जिजाऊ यांच्या मृत्यू झाला इत्यादी घटनांचा उल्लेख आहे.

यावरून असा निष्कर्ष निघतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 रोजी तांत्रिक पद्धतीने झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ अतिशय साध्या पद्धतीने झाला.

तत्कालीन पाश्‍चात्त्य वखार वाल्यांनी किंवा फारसीत या दुसरा राज्याभिषेकाचा उल्लेख आढळून येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु (Chatrapati Shivaji Maharaj Death)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे कारण (Chatrapati Shivaji Maharaj Death Reason)

ब्रिटिश नोंदीमध्ये असे सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु रक्तरंजित प्रवाहामुळे 12 दिवस (Chatrapati Shivaji Maharaj Death Reason) आजारी असल्यामुळे झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे मृत्यूचे कारण कृष्णाजी अनंत सभासद आपल्या सभासद बखरीमध्ये लिहितात की महाराजांच्या मृत्यूचे कारण ताप हे आहे.

काही संशयास्पद कारणांनी राणी सोयराबाई यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याचा आरोप आहेत.

त्याचे कारण म्हणजे राजाराम महाराजांना छत्रपती राणी सोयराबाई यांना बनवायचे होते.

छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यू चे खरे कारण (Chatrapati Shivaji Maharaj Death Reason) सध्यातरी एक वादाचे कारण आहे.

छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षे जगले.

FAQ on Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला कोणता जिंकला?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला किल्ला तोरणा जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी किती होत्या?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8 पत्नीचे नाव (सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई,सकवारबाई, लक्ष्मीबाई, सगणाबाई, गुणवंतीबाई) हे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु मृत्यू कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु 3 एप्रिल 1680 रोजी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू कधी झाला?

जन्म 19 फेब्रुवारी 1630
मृत्यू 3 एप्रिल 1680

छत्रपती शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षे जगले.

निष्कर्ष

Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi, शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा

2 thoughts on “छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी | Chatrapati Shivaji Maharaj Information in Marathi”

  1. रितेश दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे लेख खूप छान पद्धतीने समजावले. तुमचे खूप खूप धन्यवाद …. जय शिवराय….

Comments are closed.