जिंजी किल्ला माहिती मराठी | Jinji Fort Information in Marathi

Jinji Fort Information in Marathi जिंजी किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

जिंजी किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.

जिंजी किल्ल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे हा किल्ला राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावरून पुन्हा स्वराज्याची नव्याने सुरुवात केली.

जर तुम्ही जिंजी किल्ला बघितला असेल तर तुम्हाला माहीतच असेल की भौगोलिक दृष्ट्या हा किल्ला किती महत्त्वाचा आहे.

जर हा किल्ला तुम्ही नसेल बघितला तर नक्की हा किल्ला बघावा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला राजनीति च्या बळावर जिंकला आहे.

जिंजी किल्ला माहिती मराठी (Jinji Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)जिंजी किल्ला
उंची (Height) ८०० फुट
प्रकार (Type)
ठिकाण (Place)
जवळचे गाव (Nearest Village)
स्थापना(Built) 1190 AD
कोणी बांधलाअनंता कोन
सध्याची स्थिती व्यवस्थित
Jinji Fort Information History Map Marathi

जिंजी किल्ला इतिहास मराठी (Jinji Fort History in Marathi)

जिंजी किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे.

कोनार राजघराण्यातील अनंता कोनने 1190 AD च्या सुमारास जिंजी किल्ल्या बांधले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला कसा जिंकला?

छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयासाठी निघाले तेव्हा नंदियाल कडप्पा मार्गे तिरुपती येथे पोहोचले.

तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी कांचीवरम पोहोचून शिव वैष्णवांचा दर्शन घेतलं.

नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले छावणी मद्रास आत्ताच्या चेन्नईमध्ये विश्रांती घेण्यासाठी थांबवली होती.

नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पाच हजाराचे सैन्य कांजीवरम मार्गे जिंजी किल्ला कडे पाठवले.

हे सैन्य महाराजांच्या पुढे काही दिवस चालत होते.

जिंजी किल्ल्यावर आदिलशाहीचा नासिर मोहम्मद किल्लेदार होता.

नासिर मुहम्मद हा आदिलशाहीचा वजीर खवास खान याचा भाऊ होता.

आदिलशाहीचा वजीर असलेला खवास खानाचा खून झाल्यामुळे नवीन वजीर बहलोलखान यांनी नासिर मोहम्मद वर कारवाई करणे सुरू केले.

त्यासाठी बहलोलखान यांनी शेर खान याला नासिर मुहम्मद याला याला पकडण्यासाठी व जिंजी किल्ला ताब्यात घेण्यासाठी सांगितले.

तेव्हा शेरखान मदुराईच्या तिउरवाडी येथे होता.

शेर खान यांनी जिंजी किल्ला घेण्याआधीच नासिर मुहम्मद यांनी कुतुबशाही कडे मदत मागितली असता छत्रपती शिवाजी महाराजांना कळले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने जिंजी किल्ल्यावर पाठवलेल्या सुभेदाराने थेट नासिर मोहम्मद यांची भेट घेतली, व त्याला 50000 ची जहागिरी दर साल देतो असे म्हटले.

सोबतच त्या सुभेदाराने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर चालून येत आहे असे म्हंटले.

हे ऐकताच नासिर मुहम्मद यांनी क्षणाचाही विलंब न लावता जिंजी किल्ला ताब्यात दिला.

अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी राजनीती आणि बुद्धीचा उत्तम उपयोग करून जिंजी किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला लढाई न करता जिंकला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली जिंजी किल्ल्यावरील पुनर्बांधणी व नेमणुका

छत्रपती शिवाजी महाराजांना जिंजी किल्ल्यावरील बांधकामासाठी त्यांनी त्यांनी युरोपियन लोकांकडे मदत मागितली होती.

परंतु त्यांनी देण्यास नकार दिले.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीचा जुना कोट पाडला.

जिंजी किल्ल्याच्या भोवती खंदक खणले, नवीन तटबंदी बांधून घेतली व जिथे जिथे गरज वाटेल तिथे भक्कम बुरुज बांधले.

पोंडीचेरी च्या फ्रेंच गव्हर्नर च्या रोजनिशीतिल नोंद अशी आहे की जिंजी किल्ल्याचे बांधकाम इतके सुंदर आणि मजबूत आहे कि ते स्थानिक लोकांनी केले असे वाटतच नाही, तर ते युरोपातील इंजिनिअर्सनी केला असे वाटते.

जिंजी किल्ला आणि राजाराम महाराज (Jinji Fort Rajaram Maharaj)

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 12 मार्च 1689 रोजी रायगडावर राजाराम महाराजांचा राज्याभिषेक झाला.

25 मार्च 1689 रोजी मोगलांनी रायगडाच्या आजूबाजूच्या प्रदेशाला वेडा करण्यास सुरुवात केल्या.

तेव्हा महाराणी येसूबाई आणि त्यांचे मंत्री रामचंद्र पंत अमात्य यांनी मिळून मुघलांशी लढा दिला आणि राजाराम महाराजांना कावल्या घाटातून प्रतापगड आणि विशाळगड किल्ल्या द्वारे सध्या तामिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्यावर सुखरूप पोहोचवले.

राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावरून स्वराज्याची सूत्रे चालवली.

जिंजी किल्ला स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून पण ओळखला जातो.

जिंजीचा वेढा (Siege of Jinji)

औरंगजेबाने गाजी-उद-दीन फिरोज जंग ला दख्खनमध्ये मराठ्यांच्या विरोधात नियुक्त केले आणि खास झुल्फिकार खान नुसरत जंग याला जिंजी किल्ला ताब्यात घेण्यासाठी पाठवले.

सप्टेंबर 1690 मध्ये झुल्फिकार खान नुसरत जंग ने जिंजी किल्लाला वेढा घातला.

जिंजी किल्ला ला जिंकणे अशक्य होते कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला पुनर्बांधणी करून याला अभेद्य केला होता.

झुल्फिकार खान नुसरत जंग यांनी जिंजी किल्ला घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव किल्ल्यावरून येऊन वेळातील लोकांना कापत होते. आणि बाहेरून सुद्धा मराठ्यांचा हल्ला चालू होता.

त्याच्यामुळे झुल्फिकार खान नुसरत जंग याला खुपदा पराभव पत्करावा लागला.

जेव्हा झुल्फिकार खान याला समजले की मराठे दोन्हीकडून हल्ले करतात तेव्हा तो घाबरला.

कारण की पत्र व्यवहार पूर्णपणे थांबला होता त्याच्यामुळे झुल्फिकार खान याला कळत नव्हते की काय करावे.

ज्या काळात जिंजी अजिंक्य राहिले त्या काळात, “संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या निडर मराठा सेनापतींनी, मुघल सेनापतींचा पराभव करून आणि त्यांच्या दळणवळणाच्या ओळी तोडून कर्नाटक आणि महाराष्ट्रात कहर केला.

तेव्हा संताजी यांनी राजाराम महाराजांना सांगितले की हीच वेळ आहे की आपण पूर्ण शत्रुला मात देऊ.

परंतु राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे यांना नकार दिला.

नंतर जेव्हा जुल्फिकार खान वेढा सोडून परत जात होता तेव्हा औरंगजेबाने आपला वजीर आणि मुलासोबत चाळीस हजाराची फौज देऊन वेडा चालू ठेवण्याचा आदेश दिला.

त्याच्यानंतर घाबरलेला झुल्फिकार खान यांनी पुन्हा आक्रमक करणे चालू केले.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर, शेवटी 8 जानेवारी 1698 रोजी सात वर्षांनी ते ताब्यात घेण्यात आले.

किल्ला पडण्याच्या आधी राजाराम महाराज मात्र निसटून प्रथम वेल्लोर आणि नंतर विशाळगड येथे निघून आले.

FAQ on Jinji Fort Information in Marathi

जिंजी किल्ला कोणत्या राज्यात आहे?

तमिळनाडू

जिंजीचा किल्ला कोणी जिंकून घेतला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी

जिंजी किल्ला स्वराज्याची कितवी राजधानी आहे?

तिसरी

मराठा स्वराज्याची तिसरी राजधानी कोणती होती?

जिंजी किल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला कसा जिंकला?

राजनीति च्या बळावर

जिंजी किल्ला वर एकूण किती बालेकिल्ले आहे?

3

निष्कर्ष

Jinji Fort Information in Marathi जिंजीचा किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा