राजमाची किल्ला माहिती मराठी | Rajmachi Fort Information in Marathi

Rajmachi Fort Information in Marathi राजमाची किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

राजमाची किल्ला हा लोणावळा जवळील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

पुणे-मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहज पण आपल्याला दिसतो.

राजमाची किल्ल्याची माहिती मराठी (rajmachi killa chi mahiti marathi) मध्ये आपण या लेखात पुढे वाचू

राजमाची किल्ला माहिती मराठी (Rajmachi Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)राजमाची किल्ला
उंची (Height) 833 मीटर
प्रकार (Type) गिरिदुर्गगिरिदुर्ग
ठिकाण (Place) पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव (Nearest Village) लोणावळा,खंडाळा
स्थापना(Built)
कोणी बांधला
सध्याची स्थिती व्यवस्थित
चढाईची श्रेणी सोपी
Rajmachi Fort Information Marathi

राजमाची किल्ल्याचा इतिहास मराठी (Rajmachi Fort History in Marathi)

राजमाची किल्ल्याच्या खूप जुना इतिहास आहे. राजमाची किल्ला साधारणपणे 2500 वर्षांपूर्वीचा असावा असे म्हटले जाते कारण की राजमाची किल्ल्याच्या पश्चिम भागावर बौद्ध लेणी आहेत.

याच लेण्यांना कोंढाणे लेणी असे म्हणतात.

कोंढाणे लेणी राजमाचीवर सुद्धा आहे आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून दोन किलोमीटर वर आहे.

ही लेणी दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहनकालाच्यासुरुवातीला खोदलेली असावी.

राजमाची किल्ल्याचे भौगोलिक दृष्ट्या महत्व

कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती.

या बंदरापासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग होता.

जसा नानेघाट तसाच बोरघाट हा होता.

त्यामुळे या मार्गाचा वापर वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असे.

या व्यापारी मार्गाचे नियंत्रण ठेवण्यासाठी व जकात वसूल करण्यासाठी कोकण आणि घाटाचा वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा वापर केला जात असे.

त्यामुळे राजमाची किल्ल्याचे महत्त्व खूप वेगळे आहे.

राजमाची किल्ल्याचे भौगोलिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे या किल्ल्यावरुन आपल्याला एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाची किल्ला कधी घेतला?

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये जेव्हा कल्याण वर स्वारी केली त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोर घाटावरील राजमाची लोहगड तुंग तिकोना विसापूर हे सर्व किल्ले स्वराज्यात आणले.

यामुळे पुण्यापासून ते ठाणे पर्यंतचा सर्व प्रदेश स्वराज्य मध्ये सामील झाले.

छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते.

1713 मध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आग्रे यांना हा किल्ला दिला.

1730 मध्ये बाजीराव पेशवे पहिले यांच्या कडे हा किल्ला आला.

1776 मध्ये सदाशिवराव भाऊंचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करत बोरघाट पर्यंत पोहोचला. त्यानंतर त्याने राजमाची किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

तोतयाचे वर्चस्व वाढत चालल्यामुळे पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला व आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला.

1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

राजमाची किल्ला भुयार

राजमाची किल्ल्यावर एक भुयार आहे जिथे संकटाच्या वेळी 2500 शे लोक राहू शकते अशी जागा आहे.

पण ती जागा तुम्ही फक्त उन्हाळ्यातच बघू शकता कारण की पावसाळ्यामध्ये गडावरून जाण्याच्या मार्गावरून तिथे पाणी येतं हिवाळ्यामध्ये गवत खूप जास्त असल्यामुळे तिथपर्यंत जाता येत नाही.

जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर उन्हाळी उत्तम वेळ आहे.

तुम्ही तिच्या लोकांना विचारू शकता की ती भुयार कुठे आहे.

राजमाची किल्ला ट्रेक पुण्याहून (Rajmachi Trek from Pune)

राजमाची किल्ल्या जर तुम्हाला पुण्यावरून जायचं असेल तर तुम्ही लोकल किंवा गाडी यांनी जाऊ शकता.

जर तुमच्याकडे स्वतःची गाडी असली तर तुम्ही डायरेक्ट गडापर्यंत जाऊ शकता.

जर तुम्ही लोकलनी लोणावळा पर्यंत आले तर तुम्हाला राजमाची जायला गाडी करावे लागेल कारण की लोणावळ्यापासून राजमाचीच्या डिस्टन्स 15 किलोमीटर आहे.

पण जर तुमच्याकडे ग्रुप मोठा असला तर तुम्हाला गाडी करण्यात फायदा आहे कारण की गाडी भाडे खूप जास्त असतं.

राजमाची किल्ला सर्वांनी बघावा कारण की ति भुयार एकदा तरी सर्वांनी बघावे

FAQ on Rajmachi Fort Information in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाची किल्ला कधी ताब्यात घेतला?

1657 मध्ये

राजमाची किल्ला स्वराज्यात कधीपर्यंत होता?

छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत राजमाची किल्ला स्वराज्यात होता.

राजमाची किल्ल्यावर वरून किती किल्ले दिसू शकते?

तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी

इंग्रजांनी राजमाची किल्ला कधी ताब्यात घेतला?

1818 मध्ये

राजमाची किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते?

राजमाची किल्ल्याला पूर्वी कोकणचा दरवाजा म्हणून ओळखले जात होते.

निष्कर्ष

Rajmachi Fort Information in Marathi राजमाची किल्ला माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा

अधिक लेख वाचा