शनिवार वाडा माहिती मराठी | Shaniwar Wada Information in Marathi

Shaniwar Wada Information in Marathi, शनिवार वाडा माहिती मराठी, शनिवार वाडा इतिहास मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.

शनिवार वाड्याचे त्याची दृष्ट महत्त्व म्हणजे हा किल्ला भुईकोट आहे आणि आत काही भुयारी मार्ग बाहेर जाण्याचे रस्ते होते ते आता बंद आहे.

शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा यांनी बांधला होता.

शनिवार वाडा माहिती मराठी | Shaniwar Wada Information in Marathi

किल्ल्याचे नाव (Fort Name)शनिवार वाडा
उंची (Height) 21 फूट
ठिकाण (Place) पुणे
जवळचे गाव (Nearest Village) पुणे
स्थापना (Built)1732
कोणी बांधलाबाजीराव पेशवा
Shaniwar Wada Information  Marathi

शनिवार वाडा इतिहास मराठी (Shaniwar Wada History in Marathi)

शनिवार वाड्याचे बांधण्याचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले.

22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याचे वास्तुशांती करण्यात आली.

दोन्ही ही दिवस शनिवार असल्यामुळे या वाड्याचे नाव शनिवार वाडा ठेवण्यात आले.

शनिवार वाडा ची भिंत 21 फूट उंच असून त्याची तटबंदी 950 फूट लांबीचे आहे.

शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे आहेत आणि नऊ बुरुज आहेत.

शनिवार वाड्याला पाच दरवाजाची नावे याप्रमाणे आहेत पहिला दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा, दुसरा दरवाजा मस्तानी दरवाजा, तिसरा दरवाजा, तिसरा दरवाजा खिडकी दरवाजा,  चौथा दरवाजा गणेश दरवाजा, पाचवा दरवाजा नाटक शाळा किंवा जांबुळ दरवाजा असे होय.

हे दरवाजे आजही उत्तम रित्या चांगले आहे तुम्ही ते शनिवार वाडा ला गेल्यावर बघू शकता.

शनिवार वाडा आत जाण्यासाठी दिल्ली दरवाजातून जावे लागते.

दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट आणि 14 फूट रुंद आहे.

दिल्ली दरवाजा वर नगारखाना आहे त्याच्यावरून तुम्ही पूर्ण शनिवार वाडा आणि पुण्यातील काही भाग बघू शकता.

इंग्रजांच्या काळात वाचलेला नगरखाना हाच एक असा भाग आहे जो आज चांगल्या रित्या उभा आहे.

शनिवार वाड्याची मुख्य इमारती 6 मजलीची होती.

शनिवार वाडा मध्ये गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादी महाल आणि दिवाणखाने होते पण ते आज अस्तित्वात नाही.

शनिवार वाडा मध्ये अनेक प्रकारचे देवघर सुद्धा होते ते म्हणजे नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर असे होय पण ते आज अस्तित्वात नाही.

शनिवार वाड्यातील पाहण्यासारखी ठिकाणे

दिल्ली दरवाजा

शनिवार वाड्यात आत मध्ये जाण्यासाठी जो दरवाजा लागतो तो दिल्ली दरवाजा आहे.

दिल्ली दरवाजा हा उत्तम रित्या चांगला आहे.

नगारखाना

दिल्ली दरवाजाच्या वर जो नगारखाना आहे त्याच्यावरून आपण पूर्ण शनिवार वाडा बघू शकतो आणि पुण्यातील काही भाग पण बघू शकतो.

गणेशाची मूर्तीचे चित्र

देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहे.

कारंज्याच्या अवशेष

हजारी कारंजे कमळ आकाराचे असून त्याचा घेर सुमारे ऐशी फूट होता. कारंजा मध्ये सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळीत सोळा याप्रमाणे सर्व पाकळ्यांत मिळून दोनशे छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती.

Shaniwar Wada Images

Shaniwar wada images

शनिवार वाड्यातील भुताचे रहस्य (Shaniwar Wada Haunted Story in Marathi)

नारायणराव पेशव्यांचा जन्म इसवी सन 1755 मध्ये झाला.

नारायणराव पेशवे बालाजी बाजीराव चे सर्वात लहान मुल होते. 1772 मध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला.

ऑगस्ट 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्या आज्ञेवरून सुमेर सिंह गर्दी आणि काही अंगरक्षकांनी नारायणराव पेशवे यांची हत्या केली.

जेव्हा वाड्यात नारायणराव पेशवे यांना मारण्यासाठी लोक गेली तेव्हा त्यांनी काका मला वाचवा काका मला वाचवा स्वतःला वाचवण्यासाठी अशी हाक देत असताना त्यांची हत्या करण्यात आली.

असे म्हटले जाते की गणपतीची आरती चालू असताना त्यांची हत्या केली म्हणून त्यांचा आवाज जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही.

आणि रात्री त्यांचे शव नदीत सोडण्यात आले.

म्हणून शनिवार वाड्यात कधीकधी नारायणराव पेशव्यांचा आवाज काका मला वाचवा काका मला वाचवा येतो असे काही लोकांचे म्हणणे आहे.

म्हणून शनिवार वाड्यात रात्री जाण्यास सर्वांना मनाई आहे.

शनिवार वाड्याची माहिती व्हिडिओमध्ये बघण्यासाठी खाली क्लिक करा

FAQ on Shaniwar Wada Information in Marathi

शनिवार वाडा कुठे आहे?

पुणे जिल्ह्यात

शनिवार वाडा कोणी बांधला?

बाजीराव पेशवा

शनिवार वाडा ही किती मजली इमारत होती?

6 मजली

शनिवार वाडा कशामुळे प्रसिद्ध आहे?

Ans. शनिवार वाडा हा मराठी साम्राज्यातील बाजीराव पेशव्यांचा यांचा वाडा होता. पेशव्यांच्या प्रमुख घडामोडी वाड्यातून होत असे. शनिवार वाडा हा भुतांच्या आवाजामुळे पण प्रसिद्ध आहे.

शनिवार वाडा कोणत्या जिल्ह्यात आहे?

पुणे जिल्ह्यात

निष्कर्ष

Shaniwar Wada Information in Marathi शनिवार वाडा माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा